वाशिम, दि. ५ जून — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाशिम जिल्हा बैठकीस आज अमरावती विभागीय निरीक्षक मा. श्री. संजयभाऊ खोडके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीस वाशिम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा ठाकरे हे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पक्षाच्या आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच संघटनात्मक बांधणीवर सखोल चर्चा करण्यात आली. पक्षबांधणी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने काही महत्वाच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.
या बैठकीत श्री. पांडुरंजी कोठाळे यांची वाशिम-मंगरूळपीर विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच श्री. अरुणजी वानखेडे यांना कारंजा तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. दोन्ही नविन पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
पक्ष संघटनाच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत फलदायी ठरली असून जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
0 Comments