Ticker

6/recent/ticker-posts

घनकचरा व्यवस्थापनाच्या निष्क्रियतेविरोधात गांधीगिरी आंदोलनाची चेतावणीमाजी नगरसेविका रेखा गावंडे यांचा प्रशासनाला इशारा; ५ जून रोजी आंदोलनाची तयारी



कचऱ्याची होळी, साडी-चोळीचा आहेर - प्रशासनाच्या झोपेचा करणार जागर!"


मंगरूळपीर (सुधाकर चौधरी) –

 मंगरूळपीर नगरपरिषद अंतर्गत घनकचरा घंटागाडी सेवा बंद झाल्यामुळे शहरातील महिलांना कचरा फेकण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका सौ. रेखा अनिल गावंडे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

त्यांनी जिल्हाधिकारी, वाशिम यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ५ जून २०२५ रोजी, त्या व त्यांचे पती नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात घनकचरा आणून त्याची ‘होळी आंदोलन’ करणार आहेत. यावेळी मुख्याधिकारी यांना साडी-चोळी व बांगड्यांचा आहेर देऊन निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

महिलांनी जमा करून ठेवलेला कचरा सडू लागला असून त्यामुळे शहरात अस्वच्छतेचे व दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मुंबईसह अमरावती विभागात करोनाचे रुग्ण वाढत असताना अशा प्रकारची परिस्थिती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत आहे.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, शासनाने कोटी कोटी रुपयांचे कंत्राट दिलेले असूनसुद्धा, गेल्या दोन महिन्यांपासून घंटागाडी कामगारांचे पगार न झाल्यामुळे ते संपावर गेले आहेत. याचा थेट परिणाम नागरिकांवर होत असून प्रशासन मात्र ‘कुंभकर्णी झोपेत’ आहे, अशी घणाघाती टीका सौ. गावंडे यांनी केली.

या आंदोलनाची प्रत जिल्हाधिकारी वाशिम, नगर विकास मंत्रालय (महाराष्ट्र शासन), उपविभागीय अधिकारी, व तहसील कार्यालय यांनाही पाठवण्यात आली आहे.

सौ. गावंडे यांच्या शिवराज मित्र मंडळ व महिला मंडळाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, "अर्धं तुम्ही, अर्धं आम्ही" या उक्तीप्रमाणे घनकचऱ्याची जबाबदारी प्रशासननेही स्वीकारावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

घंटागाडी बंद, महिलांची कुचंबणा – आता गांधीगिरीची वेळ !"

Post a Comment

0 Comments