Ticker

6/recent/ticker-posts

५ जूनला अयोध्येत जय श्रीरामचा गजर; राम दरबारासह ८ मंदिरांची होणार प्राण प्रतिष्ठासतीश भाऊ हिवरकर यांनी दिली माहिती


वाशिम 

अयोध्या – दिनांक ५ जून २०२५ रोजी अयोध्या नगरीत पुन्हा एकदा जय श्रीराम चा गजर दुमदुमणार आहे. श्री अयोध्या जीमध्ये राम दरबारासह ८ भव्य मंदिरांची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार असून, हा सोहळा शुभ अभिजीत मुहूर्तात, वैदिक मंत्रोच्चारासह पार पडणार असल्याची माहिती सतीश भाऊ हिवरकर यांनी दिली आहे.

या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या माध्यमातून भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान आणि अन्य देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. वैदिक पद्धतीने विधिवत होणारा हा सोहळा संपूर्ण अयोध्या नगरीत भक्तीचा आणि उत्साहाचा माहोल निर्माण करणार आहे.

भाविकांमध्ये या दिवशी मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळत असून, अयोध्येचे वातावरण आधीपासूनच भक्तिमय झाले आहे. या भव्य आयोजनात देशभरातून संत, महंत, विद्वान पंडित तसेच हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत.

यासंदर्भात बोलताना सतीश भाऊ हिवरकर म्हणाले, "ही केवळ प्राण प्रतिष्ठा नसून, भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा एक ऐतिहासिक क्षण आहे."

या दिवशी अयोध्येतील मंदिरांमध्ये वैदिक परंपरेची अमूल्य झलक पाहायला मिळणार असून, जय श्रीराम च्या घोषणांनी संपूर्ण परिसर गूंजून जाणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची सर्वत्र उत्सुकता आहे.

Post a Comment

0 Comments