Ticker

6/recent/ticker-posts

कार व दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू; मानव सेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांची तत्पर मदत


उजळेश्वर (ता. बार्शीटाकळी) | 24 जुलै 2025 – पिंजर ते बार्शीटाकळी रस्त्यावरील उजळेश्वर-अजनी फाट्यावर कार व दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या 20 मिनिटांत घटनास्थळी धाव घेत तत्पर सेवा दिली.

या अपघातात दुचाकीस्वारांना जबर धडक बसल्याने ते रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. या घटनेची माहिती सचिन उंबरकार (पिंजर) यांनी संस्थेचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. कॉल मिळताच पथकातील जवान ज्ञानेश्वर जाधव आणि अंकुश सदाफळे हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी पोहोचून त्यांनी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार धुमाळ सर व पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने जखमी व मृत व्यक्तींना तात्काळ मदत केली. जखमींना 108 रुग्णवाहिकेच्या साहाय्याने व मृतांना मानव सेवा पथकाच्या रुग्णवाहिकेतून पुढील कार्यवाहीसाठी अकोला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

या अपघातात दुचाकीवरील कुमार विजय जाधव (रा. मोझरी खु., वय 25) हा घटनास्थळीच ठार झाला, तर गोवर्धन राठोड (रा. महागाव लोहगाव, वय 55) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कार चालक अश्विन ठाकरे (रा. जनुना) हे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या वेळेवर दाखल होऊन दिलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Post a Comment

0 Comments