Ticker

6/recent/ticker-posts

चेहेल गावात नवश्या गणपतीच्या साक्षीने निकुंज टावरीचा गौरव!



SRCC, दिल्ली येथे प्रवेश मिळवून नाव उज्वल करणाऱ्या गुणवंताचा शाल, श्रीफळ व प्रतिमा देऊन सन्मान!

– मंगरूळपीर प्रतिनिधी

कोंढाळी गावातील निकुंज योगेश टावरी याने आपल्या जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर देशातील अव्वल क्रमांकाच्या वाणिज्य महाविद्यालयात – श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC), दिल्ली – येथे प्रवेश मिळवून कोंढाळी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

त्याच्या या अद्वितीय यशाचा गौरव नवश्या गणपतीच्या साक्षीने करण्यात आला. गावात आयोजित विशेष कार्यक्रमात शाल, श्रीफळ आणि नवश्या गणपतीची प्रतिमा देऊन निकुंजचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित मान्यवर होते –

👉  नवश्या गणपती संस्थांचे संचालक डॉक्टर दत्तात्रय चौधरी

👉 कर्मयोगी बापूरावजी चौधरी एनजीओ चे संचालक शेषरावजी चौधरी
👉 तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनोद भाऊ चौधरी
👉 सामाजिक कार्यकर्ते जगदीशजी काबरा
👉 "वाशिम खबर आवाज महाराष्ट्र"चे संपादक सुधाकर चौधरी
👉 सामाजिक कार्यकर्ते आकाश चौधरी, गंगाराम चौधरी, रामा चौधरी, गजानन इंगोले, दत्ता चौधरी, सुभाष चौधरी, राजू मनवर,

या सन्मान सोहळ्यात बोलताना तंटामुक्ती अध्यक्ष विनोद भाऊ चौधरी म्हणाले –

“निकुंजसारख्या विद्यार्थ्यांनी  SRCC सारख्या संस्थेत प्रवेश मिळवणं हे केवळ त्याचं नव्हे, तर संपूर्ण समाजाचं यश आहे. नव्या पिढीला दिशा दाखवणारा हा आदर्श विद्यार्थी आहे.”

“निकुंजचं हे यश म्हणजे कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि  संस्कार यांचं सुंदर मिश्रण आहे.”

निकुंज टावरी याच्या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे. नवश्या गणपतीच्या आशीर्वादाने आणि कुटुंबाच्या पाठबळाने त्याने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, हे निश्चित!


– पुढील वाटचालीसाठी ' नवश्या गणपती उत्सव समिती परिवाराकडून निकुंजला मनःपूर्वक शुभेच्छा!


Post a Comment

0 Comments