मंगरूळपीर (प्रतिनिधी) –
मंगरूळपीर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील अभ्यासक, प्राध्यापक आणि उद्योजक यांच्या संयुक्त पुढाकाराने गुजरात येथे चिंतन अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
हा दौरा केवळ एक पाहणी नव्हता, तर तालुक्यातील युवकांना नवीन दृष्टिकोन, उद्यमशीलता आणि सामाजिक जाणिवा यांची प्रेरणा मिळावी, या हेतूने तो राबविण्यात आला.
या दौऱ्यात पुढील मान्यवरांचा सक्रिय सहभाग होता:
🔹 प्रा. नंदकिशोर गोरे – भगवंत महाविद्यालय, मानोली
🔹 सुरेश भाऊ माणिकराव – माजी प्राध्यापक
🔹 संदीप निकम – कृषी सेवा केंद्राचे संचालक
🔹 दत्ताभाऊ सरोदे – अडते प्रतिष्ठित व्यापारी
🔹 सुधाकर चौधरी – वाशिम खबर आवाज महाराष्ट्रचे संपादक
🔹 करण चौधरी – वाहन चालक, दौऱ्याचे महत्त्वाचे सहकारी
अक्कलकुवा येथील व्यापारी राहुल चौधरी यांच्याशी साधलेला संवाद
या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून गुजरातमधील शेती प्रक्रिया उद्योग, ग्रामीण विकासाचे मॉडेल, सामाजिक उपक्रम व शैक्षणिक संस्था यांना भेटी देण्यात आल्या.
दौऱ्यादरम्यान विविध उपक्रम, कार्यशाळा व अनुभवकथनांमधून सहभागी सदस्यांनी सृजनशीलता, नैतिक नेतृत्व, आणि यशस्वी ग्रामीण विकासाची दिशा याबाबत महत्त्वपूर्ण माहिती आत्मसात केली.
प्रा. नंदकिशोर गोरे यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की,
"केवळ पुस्तकापुरते शिक्षण पुरेसं नाही, प्रत्यक्ष कृतीतून शिकणं हाच खरा अभ्यास आहे."
सुरेश भाऊ माणिकराव – माजी प्रा.
"प्रत्येकाने सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे आपल्या समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार असा विश्वास त्यांनी दर्शवला करिअर कोणत्याही क्षेत्रात करता येते ."
वाशिम खबर आवाजचे संपादक सुधाकर चौधरी यांनी सांगितले की,
"अशा अभ्यासदौऱ्यांतून तालुक्यातील युवकांना उद्योजकतेची प्रेरणा मिळते. फक्त नोकरीकडेच लक्ष न देता, नवसंस्थापन व समाजहिताकडे वळणं गरजेचं आहे."
दौऱ्याचा अनुभव हा सहभागी सदस्यांसाठी आयुष्यभरासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
तालुक्यातील तरुणांनी अशा अभ्यासवृत्तीने पुढे यावं, यासाठी हा दौरा एक दिशा आणि दृष्टी घडवणारा ठरला आहे.
0 Comments