Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चेहेल येथे वृक्षारोपणाचा मंगल सोहळा



मंगरुळपीर (प्रतिनिधी) –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस या वर्षी सप्ताह उत्सवाच्या रूपाने साजरा करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार, राज्याचे मा.राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब आणि वाशिम जिल्हा अध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष मा. चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या कुशल मार्गदर्शनात संपूर्ण मंगरुळपीर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याच उपक्रमाअंतर्गत दि. २६ जुलै २०२५ रोजी, शनिवार सकाळी १० वाजता, जिल्हा परिषद शाळा चेहेल येथे वृक्षारोपणाचा मंगल कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात मंगरुळपीर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शालिकराम पाटील राऊत नागी, पांडुरंग कोठाळे शेलुबाजार, चंद्रकांत पाकधने मंगरूळपीर, भास्कर पाटील शेगीकर, अमोल पाटील, आर के राठोड, संजू भाऊ अवगण इत्यादी मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले सेलचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, खरेदी-विक्री संघाचे प्रतिनिधी, जिनिंग-प्रेसिंग संचालक, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सोसायटीचे पदाधिकारी आणि पक्षाचे अनेक आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवश्या गणपती संस्थांचे संचालक डॉक्टर दत्तात्रय चौधरी, उपसरपंच प्रदीप चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद भाऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते आकाश चौधरी, ग्रामपंचायतचे सदस्य, राजू मनवर, अमोल चौधरी, साहेबराव वंजारे, विनोद राठोड,
रामा चौधरी, करण चौधरी, गजानन इंगोले, सुभाष चौधरी, शेखर शिंदे,
चेहेल ग्रामस्थांनी या उपक्रमाला मन:पूर्वक साथ दिली. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अजितदादा पवार यांच्या कार्यशक्तीला आणि दूरदृष्टीला सलाम करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, "वृक्षारोपण केवळ एक कार्यक्रम नसून, ही भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. अजितदादांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राचा विकास झपाट्याने होत असून त्यांचं कार्य सर्व सामान्य जनतेच्या हृदयात घर करून बसले आहे."

कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत पार पडल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते आणि चेहेल ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून कौतुक होतआहे.

Post a Comment

0 Comments