मंगरूळपीर (ता. प्र.) | २४ जुलै २०२५ – मंगरूळपीर तालुक्यात काल सकाळी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने कंझरा, पिंपरी खुर्द, पिंपरी अवगण व शेलूबाजार परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातले बांध पूर्णतः खरडून गेले, तर काही ठिकाणी पिके आणि शेतीसाठी वापरले जाणारे साहित्यही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वाशीम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामभाऊ खोडे यांनी आज सकाळीच तातडीने दौरा केला. यावेळी त्यांच्या सोबत भाजप तालुका अध्यक्ष सुदर्शन पाटील धोटे, सावता परिषद कार्याध्यक्ष पांडुरंग कोठाळे, तसेच उपविभागीय अधिकारी व मंगरूळपीर तहसीलदार हे उपस्थित होते.
आमदार खोडे यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि झालेल्या नुकसानीची बारकाईने पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकरी बांधव व विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍️ आमदार श्यामभाऊ खोडे यांची प्रतिक्रिया:
"शेतकऱ्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. कुठल्याही शेतकऱ्याला घाबरण्याची गरज नाही. प्रशासनाच्या मदतीने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला भरघोस मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू."
बातमीचा सारांश:
- पावसामुळे शेतकऱ्यांचे बांध व पीक वाहून गेले
- आमदार खोडे यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली
- तात्काळ पंचनामे व मदतीसाठी आश्वासन
- शेतकऱ्यांना धीर देणारा आमदार
0 Comments