मंगरूलनाथ,
श्री चारभुजानाथ मंदीराच्या शताब्दी वर्षानिमित्त भक्ती, ज्ञान व सांस्कृतिक उन्मेषाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळणार आहे. मंदिर परिसरातील देवकी भवन, राजस्थानी चौक येथे संगीतमय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हा पवित्र सोहळा गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ ते बुधवार, २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत दररोज दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत रंगणार असून, प्रसिद्ध कथा प्रवचनकार ह.भ.प. विशाल महाराज आळंदीकर आपल्या सुमधुर वाणीमधून श्रीमद्भागवत महापुराणातील जीवनमार्गदर्शक कथा, भक्तिरस आणि अध्यात्मिक संदेश श्रावणीय स्वरात सादर करणार आहेत.
या ज्ञानयज्ञाचे महत्त्व सांगताना आयोजन समितीतील सदस्यांनी सांगितले की, “श्रीमद्भागवत कथा ही केवळ धार्मिक गोष्ट नसून जीवनाला दिशा देणारी आणि अंतःकरणाला शांती देणारी एक आध्यात्मिक अनुभूती आहे. शताब्दी सोहळ्याचे हे आयोजन श्रद्धा, सेवा आणि संस्कार यांचे जणू एकत्रित प्रतीक आहे.”
समस्त श्री चारभुजानाथ भक्त परिवार यांनी या सत्संगाचा लाभ घ्यावा, तसेच आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांना या पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
— वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी
0 Comments