मंगरुळपीर (सुधाकर चौधरी) –
शनिवारी रात्री आकाशात दुर्मिळ असा खग्रास चंद्रग्रहण अनुभवायला मिळाले. हे ग्रहण रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होऊन पहाटे १ वाजून २७ मिनिटांपर्यंत संपूर्ण भारतातून स्पष्टपणे दिसले.
पृथ्वी सूर्य व चंद्र यांच्या मधोमध आल्याने तिची सावली थेट चंद्रावर पडली आणि चंद्र लालसर-तांबूस झळाळी धारण करू लागला. या अवस्थेला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. आकाश स्वच्छ असलेल्या भागांत हा देखावा डोळ्यांनी स्पष्ट पाहता आला.
वैज्ञानिकांच्या मते चंद्रग्रहण ही पूर्णपणे नैसर्गिक व खगोलीय घटना असून याचा आरोग्याशी काहीही संबंध नाही. मात्र भारतीय परंपरेनुसार या काळात उपवास, स्नान व धार्मिक विधी करण्याची प्रथा आहे.
🌕 वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने आपल्या सर्वांसाठी काही खास क्षणचित्रे टिपण्यात आली आहेत.
खास क्षणचित्रे
- ग्रहणाचा प्रारंभिक टप्पा – चंद्र सावलीच्या गर्भात प्रवेश करताना.
- पूर्ण खग्रास – चंद्र पूर्णपणे काळसर छटेत लपलेला क्षण.
- लालसर झळाळी – चंद्र तांबूस-केशरी रंगाने उजळलेला अद्भुत नजारा.
- ग्रहण मध्यावर – पृथ्वीच्या सावलीत चंद्राची झगमगती कला.
- ग्रहणाचा शेवट – सावलीतून बाहेर पडत पुन्हा प्रकाशमान होताना चंद्र.
आजचा हा खगोलीय सोहळा अनेक खगोलप्रेमी, छायाचित्रकार आणि विद्यार्थी यांच्यासाठी संस्मरणीय ठरनारा.
0 Comments