मंगरुळपीर (सुधाकर चौधरी)
–
राष्ट्रीय पोषक आहार माह निमित्त यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालय, शेंदुर्जना घाट यांच्या MOU अंतर्गत गृह अर्थशास्त्र विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने "पोषक आहार आणि आरोग्य" या विषयावर जनजागृती ऑनलाइन प्रश्नमंजुषा दिनांक 06 सप्टेंबर 2025 रोजी शनिवारी यशस्वीपणे आयोजित करण्यात आली.
या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी प्रा. डॉ. लुंबिनी गणवीर यांनी पोषक आहाराचे महत्व अधोरेखित करताना, "समाजामध्ये आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव होण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे," असे प्रतिपादन केले.
प्रा. सुषमा जाजू यांनी पोषक आहाराचे घटक, मातांमध्ये जागृती निर्माण करण्याचे महत्व व पोषणामुळे होणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीवृद्धीवर प्रकाश टाकला. "योग्य आहारामुळे हानिकारक रोगजंतू व विषाणूंविरुद्ध लढण्याची ताकद मिळते," असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. फुलारी यांनी आहाराद्वारे मिळणाऱ्या पौष्टिक घटकांचे महत्व अधोरेखित करत उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. तसेच प्राचार्य डॉ. कान्हेरकर यांनी "अन्न ही मानवाची मूलभूत गरज असून आहाराद्वारे शक्ती व आवश्यक पोषण मिळते," असे सांगत या जनजागृती उपक्रमाचे अभिनंदन केले.
प्रश्नमंजुषेत विविध महाविद्यालयांतील सुमारे 80 हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग नोंदविला. सर्व सहभागींस ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
हा उपक्रम संस्थेचे सचिव चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने, प्राचार्य डॉ. कान्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे समन्वयक प्रा. एस. एस. जाजू व डॉ. लुंबिनी गणवीर यांच्या संयोजनातून यशस्वीपणे पार पडला.
समन्वयक : प्रा. सौ. सुषमा जाजू
(गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख, य. च. कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर)
0 Comments