Ticker

6/recent/ticker-posts

निवडीत युवा नेतृत्वाला संधी; किरण चौधरींची एकमताने निवड

 


किरण चौधरींच्या निवडीने तरुण कास्तकाराला मोठी जबाबदारी – संस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात"

कोठारी : सेवा सहकार संस्था कोठारीची महत्त्वपूर्ण सभा गुरुवारी (दि. 26 नोव्हेंबर 2025) संस्थेचे अध्यक्ष शेषराव उदेभान शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अकोला व वाशिम जिल्हा प्रादेशिक कृषि सह पतसंस्था संघ मर्या., अकोला तसेच सेवा सहकारी संस्था मर्या., कोठारी यांच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक कालावधीसाठी प्रतिनिधी निवडीचा विषय सभेत चर्चेला घेण्यात आला.

संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन भविष्यातील विकास आराखड्यावर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर सर्व संचालकांनी एकमताने चेहेल येथील युवा व प्रगतशील कास्तकार किरण सुरेश चौधरी यांची प्रतिनिधी म्हणून संचालकपदी निवड केली. चौधरी यांच्या नेतृत्वातून संस्थेच्या कार्यात नवी ऊर्जा आणि गती येईल, असा विश्वास सभेनं व्यक्त केला.

निवडीची घोषणा होताच उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. दरम्यान, संचालक मंडळ, सदस्य, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक व शेतकरी संघटनांकडून किरण चौधरी यांचे अभिनंदन करण्यात येत असून नव्या नेतृत्वाने संस्थेचा विकासमार्ग अधिक भक्कम करावा, अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवीन प्रतिनिधी निवडीमुळे संस्थेत चैतन्याचे वातावरण असून, ही निवड सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Post a Comment

0 Comments