धानोरा खुर्द – वार्ताहर
श्री धानोरकर आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७६ वा भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख आणि त्यातील मूल्यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री एम. एन. धानोरकर सर यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री उचित सर व श्री जी. व्ही. पाटील सर उपस्थित होते.
भारताचे संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित मनोगते, गीतं व सांस्कृतिक सादरीकरणे करीत कार्यक्रमात रंगत आणली.
प्रमुख अतिथी उचित सर यांनी संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मंगेश धानोरकर सर यांनी विद्यार्थ्यांनी संविधानाचे नियमित वाचन करणे, त्यातील मूल्यांचे आचरणात रूपांतर करणे याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व सुबक संचालन कुमारी प्रतीक्षा बडवे (इ. ७ वी) हिने केले. तर आभार प्रदर्शन सोनाली चव्हाण हिने मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Comments