मंगरूळपीर : विकासाचा वेग, लोकसहभागाची नितांत आस्था आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आघाडीवर राहून संघर्ष करणारे वाशिम-मंगरूळपीर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्याम भाऊ खोडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरात विविध उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली असून सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार खोडे यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
या निमित्ताने संघर्ष समिती, हुडको कॉलनी, मंगरूळपीर यांच्या वतीने विशेष शुभेच्छा संदेश देण्यात आला. परिसरातील जनतेला न्याय मिळावा, स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले श्याम भाऊ खोडे हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
शुभेच्छुक मान्यवर :
- प्राध्यापक नंदकिशोर गोरे
- प्राध्यापक विजय शेळके
- मा. प्राध्यापक श्रीराम मिटकरी
- कर्नल अशोक बेंद्रे
- व्यापारी श्रिरीश बियाणी
- संपादक सुधाकर चौधरी
मान्यवरांनी व्यक्त केले की, “श्याम भाऊंच्या नेतृत्वाखाली विकासाचा वेग आणखी जोमाने वाढावा, जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारे निर्णय सतत होत राहावेत आणि आगामी काळ अधिक यशस्वी ठरावा”, अशी मनापासून प्रार्थना करण्यात आली.
शेवटी, मंगरूळपीर तालुक्यातील नागरिकांकडूनही श्याम भाऊंवर प्रेमाचा वर्षाव होत असून “आमदार श्याम भाऊ खोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा – दीर्घ आयुष्य लाभो, जनतेच्या सेवेत त्यांचे कार्य असाच उज्ज्वल राहो!” असा एकमुखी स्वर उमटत आहे.
0 Comments