भुसावळ : प्रतिनिधी
ताप्ती पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका, कर्तव्यनिष्ठ समाजसेविका आणि विद्यार्थ्यांच्या अत्यंत लाडक्या व्यक्तिमत्त्व असलेल्या सौ. पुनम विजय फालक यांना इचलकरंजी येथे आयोजित भव्य शाहू महोत्सवात राज्यस्तरीय शाहू महाराज नारी रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार रवीसाहेब रजपुते (माजी उपनगराध्यक्ष), प्राचार्य डॉ. त्रिशला कदम (अध्यक्ष), सौ. अक्षरा कांबळे, अरुण रंजना कांबळे, संतोष निकम, प्रमोद अंदुरकर, स्वप्निल गोरंबेकर आणि तेजस्विनी राजपूत यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. कोल्हापूरच्या मान्यवरांच्या आशिर्वादाने हा सोहळा अधिकच ऐतिहासिक ठरला.
कार्यक्रमात संकल्पना प्रमुख अरुण रंजना कांबळे यांनी सौ. फालक यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा दस्तऐवज उलगडत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नुकत्याच प्राप्त झालेल्या आदर्श शिक्षिका पुरस्काराबद्दल सुद्धा सभागृहातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना पुनम फालक यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले, त्यांच्यासमवेत स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन कांचन जगन्नाथ नेमाडेही उपस्थित होत्या.
“हा सन्मान माझ्यासाठी नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या कुटुंबीयांचा, मित्रपरिवाराचा आणि विद्यार्थ्यांचा आहे,” अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. गेल्या सोळा वर्षांत हजारो विद्यार्थ्यांचा भविष्यवेध घडवणाऱ्या सौ. फालक यांच्या कार्याची ही दखल असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
या मानाच्या तुऱ्याबद्दल ताप्ती पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन पालक, महेश फालक, विष्णूभाऊ चौधरी, संजय नाहाटा, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, नगरसेवक पिंटू कोठारी, माधुरी फालक, उल्हासनगरचे कांचन व जगन्नाथ नेमाडे, तापी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या निना कटलर यांसह भुसावळ–कुर्हेपानाचे येथील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
सौ. फालक यांचे यजमान विजय फालक, सुपुत्र जय आणि सुपुत्री लावण्या यांनीही या यशाचे मनापासून स्वागत केले. सर्व स्तरांतून त्यांच्या कार्याची प्रशंसा होत असून, उत्तरोत्तर त्यांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
0 Comments