भाजपाचा ८ डिसेंबरला धडक ‘रास्ता रोको’ – एसटी प्रशासनाला अल्टीमेटम
धानोरा खुर्द –
धानोरा खुर्द परिसरातील विद्यार्थी आणि प्रवाश्यांच्या वाढत्या गैरसोयीचा अखेर कडेलोट होत असल्याने भारतीय जनता पार्टी आसेगाव सर्कल आता आक्रमक भूमिकेत उतरली आहे. एसटी प्रशासनाचे उदासीन धोरण, वारंवार विनंत्यांकडे कानाडोळा आणि जनतेच्या सहनशक्तीची परीक्षा यामुळे भाजपाने ८ डिसेंबर २०२५ रोजी धानोरा खुर्द येथे भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
🔥 वर्षानुवर्षे मागण्या प्रलंबित – एसटी प्रशासन ठप्प!
२० नोव्हेंबर २०२५ रोजी भाजपा पदाधिकारी मंगेश धानोरकर, बाजीराव भेंडेकर व अन्य कार्यकर्त्यांनी अकोला एसटी विभागाला निवेदन देऊन —
✔ धानोरा खुर्द येथील जलद व अति जलद बस थांबा तात्काळ सुरू करावा
✔ वटफळ व दाभडी येथील बंद बसफेऱ्या त्वरीत सुरू करण्यात याव्यात
✔ विद्यार्थ्यांसाठी हिवरा खुर्द व पिंपळगाव–आसेगावपर्यंत विशेष जादा बसफेरी सुरू करावी
अशा स्पष्ट मागण्या केल्या होत्या.
पण २०१६ पासून मागण्यांचे उंबरठे झिजत आहेत, निवेदनांवर सही-सिक्के होत आहेत…
पण एसटी विभागाची ‘काही फरकच पडत नाही’ अशी भूमिका आजवर कायमच!
🚨 ८ डिसेंबरला रस्त्यावर उतरण्याचा इशारा — १० डिसेंबरपासून साखळी उपोषण!
वारंवार विनंती करूनही प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यामुळे भाजपा आक्रामक झाली असून,
➡ ८ डिसेंबर २०२५ रोजी धानोरा खुर्द येथे रास्ता रोको आंदोलन
आणि
➡ १० डिसेंबरपासून साखळी उपोषण
करण्याचा ठाम निर्णय पक्षाने घेतला आहे.
विद्यार्थ्यांची सर्वाधिक धावपळ – प्रशासनाला फरक नाही?
धनोर्यात शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना—
• सकाळच्या बस नाही,
• संध्याकाळी बस नाही,
• पायपीट, चार्टर्ड वाहनं किंवा महागडी वाहतूक अशीच पर्यायी साधने.
जनतेने वारंवार दिलेल्या तक्रारी असूनही एसटी विभागाने दोन प्रमुख बसफेऱ्या बंद ठेवून लोकांना अडचणीतच टाकल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
🛑 आंदोलनाला आमदारांना सूचना – पोलिस स्टेशनलाही कळविले
यासंदर्भातील स्पष्ट सूचना आमदार श्याम खोडे तसेच पोलीस स्टेशन आसेगाव येथे देण्यात आल्या असून भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संघर्षासाठी सज्ज झाल्याचे सांगण्यात आले.
जनतेचा संयम तुटला – आता निर्णय एसटी प्रशासनाच्या कोर्टात
लोकहिताच्या मागण्या प्रलंबित…
प्रवासाची प्रचंड गैरसोय…
विद्यार्थ्यांची होरपळ…
या सर्वांमुळे भाजपाने आता उघडपणे लढ्याचा बिगुल वाजवला आहे.
आता एसटी महामंडळ हे संकट कितपत टाळते आणि जनतेच्या बाजूने उभे राहते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
0 Comments