Ticker

6/recent/ticker-posts

पंचायत समिती सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम



महिला व बालकांच्या प्रगतीसाठी समुपदेशन केंद्राचा पुढाकार

(मंगरूळपीर सुधाकर चौधरी)

येथील पंचायत समिती सभागृहात एकात्मिक बालविकास कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने कार्यरत महिला व बालकांचे प्रगती समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षण, सामाजिक समता व स्त्रीसक्षमीकरणासाठी केलेल्या महान कार्याची सविस्तर माहिती देत उपस्थितांना प्रेरित केले. सावित्रीबाईंचे कार्य आजही समाजासाठी दिशादर्शक असून, त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवरत्न महिला मंडळ, सोनल यांच्या सचिव सौ. पेंढारकर तसेच संत गोरोबाकाका महिला संस्था यांच्या अध्यक्ष सौ. रेखा टेटवार यांच्या पुढाकारातून करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा दाभाडे (विधी सल्लागार) यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू भगत यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर अभिजीत पंडित (समुपदेशक) यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.





Post a Comment

0 Comments