नागपूरात राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिप्रदर्शनाची तयारी
अयोध्यानगरात प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य जाहीर सभा**
मंगरूळपीर | प्रतिनिधी
नागपूर महानगरातील राजकीय वातावरण तापवणारी आणि आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद दाखवणारी भव्य जाहीर सभा शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता अयोध्यानगर येथील साई मंदिरासमोर आयोजित करण्यात आली आहे. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व खासदार मा. प्रफुल पटेल यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
प्रभाग क्रमांक ३२ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार इंजि. राजकुमार नागुलवार, श्री अशोक काटले, सौ. रेखाताई काटोले व सौ. रूपालीताई पिचकाटे यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई ठाकरे (वाशिम , मंगरूळपीर) यांनी केले आहे.
या जाहीर सभेत नागपूर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि नेते उपस्थित राहणार असून, संघटनात्मक ताकद, विकासाचा अजेंडा आणि जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली जाणार आहे.
प्रमुख उपस्थिती लाभणार
▪️ मा. श्री. अनिल अहिरकर – शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागपूर
▪️ श्री श्रीकांत शिवणकर – कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागपूर
▪️ श्री राजाभाऊ ताकसांडे – जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागपूर
▪️ सौ. लक्ष्मीताई सावरकर – महासचिव, महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
▪️ प्रा. माधुरीताई पालेवाल – विदर्भ अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
▪️ श्री सुखदेव वंजारी – ओबीसी अध्यक्ष, नागपूर शहर
▪️ श्री विशाल खांडेकर – युवक अध्यक्ष, नागपूर शहर
या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विकासाभिमुख, सामाजिक न्यायाचा आणि सर्वसामान्यांच्या हक्कांचा अजेंडा जनतेसमोर मांडला जाणार असून, मतदारांशी थेट संवाद साधला जाणार आहे.
“लोकशक्तीच्या जोरावर परिवर्तन शक्य आहे,” हा संदेश देणारी ही सभा नागपूरच्या राजकारणात नवे समीकरण घडवणारी ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
👉 शनिवार, १० जानेवारी | सायं. ५ वा.
स्थळ : अयोध्यानगर साई मंदिर समोर, नागपूर
— या जाहीर सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन.
0 Comments