मंगरूळपीर | सुधाकर चौधरी
🔥 स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा जागर – पंचायत समिती मंगरूळपीर येथे जयंती उत्साहात साजरी 🔥
पंचायत समिती जुनी मंगरूळपीर येथील महिला व बालकांचे प्रगती समुपदेशन केंद्र स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांनी भारावून गेले. दिनांक ९ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व हार अर्पण करून प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
या गौरवपूर्ण प्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वाशिम मा. शिंदे साहेब, परिविक्षा अधिकारी माननीय गणेशजी ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. धावडे साहेब, सी.आर.टी. उमेशचे वरिष्ठ अधिकारी माननीय नेरकर साहेब, उमेद कायदा तथा परिविक्षा अधिकारी मा. जीनसाजी चौधरी साहेब, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मा. ढोले साहेब यांच्यासह नगर परिषद मंगरूळपीरच्या अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती गांजरे मॅडम व समन्वयक श्रीमती भोंगाडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला शिवरत्न महिला मंडळाच्या संस्थापिका व राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारप्राप्त श्रीमती वनमाला पेंढारकर यांची विशेष उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने कार्यरत असलेले महिला व बालकांचे प्रगती समुपदेशन केंद्र, शिवरत्न महिला मंडळ व गोरोबा काका महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्वामी विवेकानंदांचे “उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका” हे विचार आजच्या युवक-युवतींसाठी दीपस्तंभ ठरत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
💥 विवेकानंदांच्या विचारांनी सामाजिक भान जागृत करणारा हा कार्यक्रम मंगरूळपीरमध्ये प्रेरणादायी ठसा उमटवून गेला. 💥
0 Comments