अहिल्यादेवी–सावित्रीबाईंचा आदर्श अंगीकारण्याचे आवाहन
अभयनगर, सांगली | प्रतिनिधी
अभयनगर, सांगली येथे श्री साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना ३६५ दिवस अभिवादन संकल्प” या अभिनव उपक्रमांतर्गत २१७ व्या दिवशी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. मीनल कुडाळकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना सौ. कुडाळकर म्हणाल्या,
“महिलांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रात सक्रियपणे कार्य केले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन खांडेकर, सौ. कविता कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बापू गडदे, दरिबा बंडगर, श्रीराम अलाकुंठे, भरत मासाळ, रवी शेंडगे, शंकर घेरडे, ओंकार खांडेकर, प्रेम खांडेकर, रवींद्र काळेल, सौ. खांडेकर, सौ. काळेल आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्रांतीचा वारसा जपण्याचा आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या सेवाभावी विचारांना चालना देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून श्री साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments