मंगरूळनाथ येथे जिल्हास्तरीय श्री गुरुदेव कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
मंगरूळनाथ | प्रतिनिधी
मंगरूळनाथ येथील श्री गुरुदेव सामुदायिक प्रार्थना मंदिरात जिल्हास्तरीय श्री गुरुदेव कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या महिला विभागाच्या विविध महत्त्वपूर्ण पदांवर निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी महिला तालुका सेवा अधिकारी पदी सौ.ज्योती ठाकरे, सौ. मीरा रवींद्र वाडेकर, उपतालुका सेवाधिकारी पदी प्रचारक पदी सौ. संगीता भोजने, तर महिला शहर प्रमुख पदी सौ. सरिता पुरोहित यांची निवड करण्यात आली.
ही सर्व निवड महिला वाशिम जिल्हा सेवाधिकारी सौ. ज्योती उगले यांनी अधिकृतरित्या जाहीर केली. बैठकीदरम्यान श्री गुरुदेव विचार, ग्रामगीता आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व ‘ग्रामगीता’ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा, तालुका व शहर पातळीवरील श्री गुरुदेव कार्यकर्ते, सेवाधिकारी, मार्गदर्शक तसेच महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक कार्य, महिला सबलीकरण, सेवा उपक्रम आणि प्रचार-प्रसाराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.
0 Comments