Ticker

6/recent/ticker-posts

‘जय लक्ष्मी क्लासेस’ म्हणजे उज्वल यशाची परंपरा – प्रा. डॉ. रश्मी शर्मा



भुसावळ | प्रतिनिधी

तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील जय लक्ष्मी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन, मुलुंड (मुंबई) यांच्या वतीने आयोजित कॅरी वेअर अँड रायटिंग, स्केचिंग, कलरिंग, ग्रीटिंग कार्ड आदी विविध विषयांवरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर आपले नाव उज्वल केले आहे.


चित्रकलेत विविध रंग भरून जशी सुंदरता निर्माण होते, त्याचप्रमाणे जीवनातही संस्कृती, विचार, धैर्य, धार्मिकता व जीवनमूल्यांचे रंग भरून जीवन समृद्ध केले पाहिजे, असे प्रतिपादन इंटरनॅशनल इनरव्हील क्लबच्या ट्रेझरर, रोटरी क्लबच्या माजी अध्यक्ष व जिल्हा सचिव तसेच नाहटा महाविद्यालयाच्या ख्यातनाम प्राध्यापिका प्रा. डॉ. रश्मी शर्मा यांनी केले. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन घडविण्याचे कार्य शिक्षकांचे असून विद्यार्थी हा मातीच्या गोळ्यासारखा असतो, त्याला योग्य आकार देणे ही शिक्षकांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

या स्पर्धेत
श्रेयस बबलू भगत, देवेश नंदू काकडे, तमन्ना महावीर वैष्णव यांनी सुवर्णपदक,
हितेश नंदू काकडे यांनी रजत पदक,
तर देवेश नंदू काकडे, राज अतुल पाटील व प्रियंक जीवन छाजेड यांनी कास्य पदक मिळवून रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेच्या आगामी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. एकूण २४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.


विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षिका निवेदिता किरण ठाकरे यांनी विशेष मेहनत घेऊन मार्गदर्शन केले. तसेच ममता मुकेश महाजन व अनिल भैयालाल हरणे यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश मिळाल्याचे समाधान व्यक्त करत भविष्यात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतील, असे मत संचालिका पुनम विजय फालक यांनी व्यक्त केले.

या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी नियोजन संचालक जय फालक व लावण्या फालक यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे जय लक्ष्मी क्लासेसचे नाव अधिक उंचावले असून, गावातील विविध मान्यवरांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच क्लासेसचे अभिनंदन व कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments