विद्या भारती महाविद्यालयाच्या ‘7 स्ट्राइकर्स’चा विजेतेपदावर झेंडा
प्रतिनिधी अनिता यादव
अमरावती : G H Raisoni University, अमरावती येथे आयोजित इंटर-कॉलेज बॉक्स क्रिकेट लीग टूर्नामेंट 2026 मध्ये Vidya Bharati Mahavidyalaya Amravatiच्या ‘7 स्ट्राइकर्स’ संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता.
दिवसभर रंगलेल्या चुरशीच्या सामन्यांनंतर ‘7 स्ट्राइकर्स’ संघाने अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत ट्रॉफीसह 7 हजार रुपये रोख पारितोषिक मिळवले. तर ‘नागा स्ट्राइकर्स’ (जी. एच. रायसोनी युनिव्हर्सिटी, अमरावती) संघाने उपविजेतेपद पटकावत 5 हजार रुपये रोख आणि ट्रॉफी मिळवली. स्पर्धेत खेळाडूंनी टीमवर्क, कौशल्य आणि खेळाडूवृत्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
स्पर्धेचा शुभारंभ भव्य उद्घाटन समारंभाने झाला. यावेळी विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट आणि कुलसचिव डॉ. स्नेहिल जायसवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. चेतन बोबडे, प्रो. हेमंत डहाके, डॉ. सचिन पडोले, प्रो. अल्ताफ खान, मनीष पचकवाडे, भूषण पाटणकर, प्रो. भूषण परिकर आणि डॉ. अमर मोरे यांनीही उपस्थिती लावली. मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांच्या खेळाचे कौतुक केले.
स्पर्धेतील सामन्यांचे अंपायरिंग शुभम पवार, कार्तिक कुथे आणि शांतनु मोरे यांनी केले.
वैयक्तिक पुरस्कार विजेते :
• मॅन ऑफ द टूर्नामेंट – आदित्य यादव (विद्या भारती महाविद्यालय, अमरावती)
• सर्वोत्कृष्ट फलंदाज – आदित्य यादव (विद्या भारती महाविद्यालय, अमरावती)
• सर्वोत्कृष्ट गोलंदाज – तुषार (जी. एच. रायसोनी युनिव्हर्सिटी, अमरावती)
समारोप समारंभात प्रो. भूषण परिकर, प्रो. कुणाल बोरकर, प्रो. मोहम्मद रेहान आणि डॉ. अमर मोरे यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी लता श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शिव सोलर एनर्जी, लक्ष्य अकॅडमी, वी वानखेडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मेलघाट ब्लड सेंटर (परतवाडा) आणि आर्टिसन्स सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड यांचे सहकार्य लाभले.
0 Comments