मंगरूळपीर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
‘महिला कमजोर नाही’ नाटिकेतून दिला सशक्ततेचा संदेश; ऐतिहासिक महिलांच्या भूमिका साकारून प्रेरणा
मंगरूळपीर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजस्थानी महिला मंडळ मंगरूळपीर व राजस्थानी वरिष्ठ मंडळ मंगरूळपीर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक देवकी भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत महिला सशक्तीकरणाचा प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांपैकी ‘महिला कमजोर नाही’ या विषयावर सादर करण्यात आलेल्या नाटिकेने उपस्थितांची मने जिंकली. या नाटिकेत वीणा सोमाणी, लता बजाज, नम्रता बंग, कल्पना जाखोटिया, उषा काबरा, लता बंग व बबिता जाखोटिया यांनी प्रभावी अभिनय साकारत महिलांच्या सामर्थ्याचा संदेश दिला.
याशिवाय भारतीय इतिहासात व समाजजीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांच्या भूमिका साकारून उपस्थितांना प्रेरणा देण्यात आली. राणी लक्ष्मीबाई, जिजाबाई, सावित्रीबाई फुले, सुषमा स्वराज, लता मंगेशकर, सुष्मिता सेन, इंदिरा गांधी, मीराबाई व जोधाबाई यांसारख्या महान महिलांच्या भूमिका श्रुती मेहता, शारदा भूतडा, अमृता बाहेती, ज्योती भूतडा, माधुरी राठी, सावित्री जाखोटिया, गीता राठी, भूमिका बियानी, रश्मी भुतडा, रिता बाहेती, विद्या असावा, वर्षा बाहेती, राधा तिवारी, अर्चना बियाणी व सुरेखा बाहेती यांनी साकारल्या. त्यांच्या सादरीकरणातून महिलांच्या कर्तृत्वाचा व संघर्षाचा प्रभावी परिचय उपस्थितांना झाला.
या कार्यक्रमाला सुगना बाहेती, वर्षा असावा, सुंदरबाई बाहेती, प्रभा बजाज, प्रमिला बजाज, मंदा राठी, निर्मला राठी, नारायणीबाई मुंदडा, कांचन पारीख यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन कल्पना जाखोटिया यांनी केले, तर सुरेखा बाहेती यांनी आभार प्रदर्शन केले.
0 Comments