Ticker

6/recent/ticker-posts

जी. एच. रायसोनी विद्यापीठात कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह; ६० विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांत संधी


अनिता यादव अमरावती प्रतिनिधी 

अमरावती : जी. एच. रायसोनी विद्यापीठ (जीएचआरयू), अमरावती येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये ६० विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विविध प्रतिष्ठित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. ही कामगिरी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीचा व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा ठोस पुरावा मानली जात आहे.
सदर प्लेसमेंट प्रक्रियेत इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, सायन्स तसेच फार्मसी या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध कंपन्यांनी लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखती, गटचर्चा आणि अंतिम मुलाखत अशा बहुपदरी निवड प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली.
या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), विप्रो, एचसीएल टेक, कॉग्निजंट, एकेडमोर, अपग्रेड, पीएचएन टेक्नॉलॉजी, जस्ट डायल, ओकलंड सिस्टम्स प्रा. लि. (मेडनेट लॅब्स), एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लि., लेबेन लाइफ सायन्सेस प्रा. लि., एमईबी फार्मा प्रा. लि., नितिका फार्मास्युटिकल्स प्रा. लि., झिम लॅबोरेटरीज, रिव्हँटेज अॅडव्हायझरी अँड रिअल्टर्स एलएलपी, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयटी रत्न टेक्नॉलॉजी, सनसीड पॉवर इंडिया लि., इंडियामार्ट, मुथूट फायनान्स लि., सीझफायर इंडस्ट्रीज प्रा. लि., लुपिन लि., तसेच एनपी-एव्ही नेट प्रोटेक्टर यांसारख्या विविध क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश होता. या सर्व कंपन्यांनी वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून त्यांची निवड केली.

विद्यापीठाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलने या यशामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांना उद्योगमानदंडानुसार तयार करण्यासाठी सेलतर्फे पूर्वतयारी म्हणून मॉक इंटरव्ह्यू, अॅप्टिट्यूड टेस्ट, कम्युनिकेशन स्किल्स, तांत्रिक कौशल्य विकास, तसेच व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांनी मुलाखतीत प्रभावी कामगिरी केली.

या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, चिकाटी आणि संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे हे यश शक्य झाले आहे. उद्योग-अनुरूप अभ्यासक्रम व कौशल्य विकासावर दिलेला भर यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत.”

विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर व्यावहारिक कौशल्ये आणि योग्य मार्गदर्शन यांचे महत्त्व अधिक आहे. विद्यापीठ या दोन्ही बाबींवर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे.”

कुलसचिव डॉ. स्नेहिल जैस्वाल यांनी सांगितले की, “विद्यापीठाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने सक्षम बनवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. भविष्यात अधिकाधिक कंपन्यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांसाठी विविध करिअर संधी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

विद्यापीठ प्रशासनाने प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी सर्व कंपन्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून त्यांच्या विश्वास व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच भविष्यात उद्योग क्षेत्राशी अधिक मजबूत नाते निर्माण करून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

जी. एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच व्यावहारिक प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख शिक्षण यांचा समन्वय साधण्यावर विशेष भर देत आहे. यामुळे येथील पदवीधर विद्यार्थी स्पर्धात्मक रोजगार बाजारात सक्षमपणे उभे राहत असल्याचे या प्लेसमेंट यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Post a Comment

0 Comments