Ticker

6/recent/ticker-posts

हिंदुंवर होणारा अन्याय विश्व हिंदू परिषद सहन करणार नाही /- सतिश हिवरकर.

      

बांगलादेशमध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल व समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने मंगरूळनाथ येथे धिक्कार आंदोलनात निषेध करण्यात आला.बांगलादेशात हिंदू धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमांवर सुनियोजित रित्या हल्ले होत आहेत त्यामध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या भंग केल्या जात आहेत मंदिर उद्ध्वस्त केली जात आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत हिंदूंची घरे जाळल्या जात आहेत हे प्रकार सहन केले जाणार नाहीत असे उद्बोधन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सतीश हिवरकर यांनी केले हे सर्व नियोजित असून तेथील मंदिरांमध्ये मुस्लिम धार्मिक ग्रंथ ठेवणारा व्यक्ती हि स्वतः मुस्लिम असून त्याचे नाव इकबाल हुसेन असे आहे हा प्रकार उघडकीस आल्यावर त्याला कठोर शिक्षा व्हावी हिंदू धर्मियांवर हल्ले करून बांगला देशांमधील अल्पसंख्यांक हिंदू संपविण्याचा हा कट्टरवादी लोकांचा कट आहे हे उघडकीस येते त्यामुळे जगातील संपूर्ण हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत व देशभरात आंदोलनांच्या माध्यमातून आक्रोश व्यक्त केला जात आहे संयुक्त राष्ट्रसंघाने अशा बाबींमध्ये लक्ष घालावे अशी विनंती सुद्धा या वेळी करण्यात आली या संपूर्ण प्रकरणांमध्ये हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सतीश हिवरकर गणेश ढगे नगरसेवक सचिन पवार सुनील मालपाणी पुरुषोत्तम चितलांगे अमित रघुवंशी जयेश रघुवंशी शिवाजी कळसुले गोपाल वर्मा सचिन गर्दे सागर कडूकार गोपाल खोडके सुमित मुंधरे विलास पवार संतोष शामसुंदर पुंडलिक गादेकर मयूर ठाकरे शामराव रावपलाई दिनेश वाघ प्रशांत तळेकर मुकेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments