Ticker

6/recent/ticker-posts

शेलुबाजार परिसरामध्ये डेंगू रोगाचा हाहाकार डेंगू मुळे कुमारिकेने गमावला जीवशेलुबाजार परिसरातील ग्रामपंचायत सरपंच व सचिवांना जंतुनाशक फवारणी चा पडला विसर






मंगरुळपीर ◆

‌तालुक्यातील शेलुबाजार परिसरातील ग्रामीण भागामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे दि.२१ला एका मुलीला आपला जीव गमवावा लागला नवव्या वर्गात शिकत असलेली तऱ्हाळा येथील कु राधा गजानन खोटरे या मुलीला डेंगू या आजाराने ग्रासलेले असल्याने तिला   अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते 
उपचारा दरम्यान राधाचा मृत्यु झाला
या भयानक आजारामुळे उपचारादरम्यान आपला जीव गमवावा लागला आहे. ग्रामीण भागांमध्ये वाढत असलेल्या डेंगू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने गावातील सरपंच व सचिव तथा आरोग्य विभागाने परिसरामध्ये जंतुनाशक फवारणी करावी आज रोजी परिसरामध्ये अनेक रुग्ण तापीच्या आजाराने ग्रासलेले आहेत व त्यापुढे डेंगू  या आजाराला सामोरे जाऊन शेलुबाजार परिसरातील अनेक रुग्ण डेंगू आजाराने ग्रासलेले असल्‍याने परिसरातील दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्र  रुग्णांच्या संख्येने गच्च भरलेले आहेत त्यातच आज  तऱ्हाळा  येथील राधा या पंधरा वर्षाच्या मुलीचा या आजाराने मृत्यू  झाल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी परिसरातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावांमध्ये मच्छरांचा नायनाट  करणार्‍या धुराची फवारणी करण्यात यावी, गावात  पाण्याचे डबके साचु देऊ नये व गावातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या स्वच्छ कराव्या गावात स्वच्छता नांदेल असे कार्य ग्रामपंचायत मार्फत करावे पाणीपुरवठा विहिरीच्या टाकीची  वेळोवेळी स्वच्छता करावी अशी मागणी परिसरातील  नागरिक  करित आहे.


प्रतिक्रिया:-
आरोग्याच्या दृष्टिकोनातून गावामध्ये कुठलीही सुविधा नाही गावामध्ये प्राथमिक आरोग्य वर्धनी असून सुद्धा येथे डॉक्टर उपस्थित नसतात तसेच ग्रामपंचायत च्या वतीने गावामध्ये जंतुनाशक फवारणी वेळोवेळी केल्या जात नाही. यामुळे डेंग्यु सारख्या आजाराने डोकं वर काढले आहे. याच आजाराने माझ्या मुलीला गासून माझ्या मुलीचा आज मृत्यू झालाय तसेच गावांमध्ये अजूनही डेंग्युचे बरेच रुग्ण आहेत.
गजानन खोटरे
मुलीचे वडील, तऱ्हाळा



तऱ्हाळा येथे आरोग्य विभागाच्या कडून गावांमध्ये जंतुनाशक औषधाची धूर फवारणी करण्यात आली होती दोन दिवसात ग्रामस्थानच्या रक्ताचे नमुने घेऊन लॅब मध्ये पाठवण्यात येणार आहे तसेच नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी
डॉ.पुजा गजरे
वैद्यकीय अधिकारी
 प्राथमिक आरोग्य वर्धनी, वनोजा

Post a Comment

0 Comments