वाशिम दि 11
- सशक्त लोकायुक्त कायदा निर्मितीसाठी नव्याने जन आंदोलनाची तयारी करणे व त्याअनुषंगाने नवी कार्यकारीणी गठीत करणे यासह अन्य विषयावर चर्चा करण्यासाठी रविवार दि. 12 डिसेंबर रोजी श्री शिवाजी हायस्कूल वाशिम येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सभेला प्रा.बालाजी कोम्पलवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तर या वेळी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे वाशिम जिल्हा संघटक अविनाश पसारकर यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहतील.यापुर्वी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाची फलश्रुती म्हणून 73 वी घटना दुरुस्तीची अंमलबजावणी, ग्रामसभेला व्यापक अधिकार, माहिती अधिकार कायदा, नागरिकांची सनद, दप्तर दिरंगाई, सेवा हमी कायदा, बदल्याच्या संदर्भाने कायदा, दारूबंदी संदर्भातील कायदे, लोकपाल अशा कायद्याची निर्मिती झाली. यामुळे शासन प्रशासकीय कामात बऱ्याच प्रमाणात पारदर्शकता आली. यापुढे आता नागरिकांच्या तक्रारी वरुन उच्च पदस्थांवर कारवाई होण्याच्या दृष्टीने सशक्त लोक आयुक्त कायदा निर्माण होणे आवश्यक आहे. तथापि त्यासाठी जन आंदोलन उभे करणे गरजेचे आहे.त्यामुळे या आंदोलनाबाबत दिशा ठरविणे व या आंदोलनापुर्वी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या सक्षम कार्यकारीणी तयार करण्यासाठी या सभेत चर्चा होणार आहे. या सभेत प्रमुख पदाधिकारी यांच्या नियुक्त्या सुध्दा करण्यात येत आहेत. तरी रविवारी दि 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता शिवाजी हायस्कूल वाशिम येथे होणाऱ्या सभेला कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अविनाश पसारकर, सुधाकर चौधरी, श्याम सवई, बबनराव ठाकरे, आरिफ पोपटे, महादेव काठोळे, योगेश देशमुख, अरविंद देशमुख, प्रशांत सरनाईक, गजानन घोडे, नितीन घोडे, तानाजी गंगावणे, दत्तराव काळबांडे, सोनू सुडके, अभय बेलोकार,विनायक उज्जैनकर, राजकुमार बोनकिले, प्रा अनिल काळे, रामेश्वर अवचार, संतोष नायक, प्रा. प्रशांत कव्हर, प्रा. दिगंबर गुडदे, सय्यद अयुब यांनी केले आहे.

0 Comments