Ticker

6/recent/ticker-posts

राजकीय पदाधिकारी व भूमाफियांची दादागिरी,महसूल विभागाचे सोंग:जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप करणे गरजेचे

मंगरुळपिर  
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर शहरातील गुंठेवारी जमिनीच्या नियमबाह्य खरेदी-विक्रीच्या प्रकरणांसह काही विशिष्ट व सोन्याचा भाव देणाऱ्या जागांवरील आरक्षण रद्द करण्याचा घाट रचल्या जात असल्याच्या प्रकरणांची गंभीर दखल वाशिम जिल्हाधिकारी यांनी घेणे गरजेचे आहे,सध्या मंगरुळपिर शहरात अकृषिक जमिनीवर गुंठेवारी पद्धतीने प्लॉट विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू असल्याची चर्चा आहे.
   मंगरुळपिर शहरातील बडे राजकारणी तसेच काही भूखंड माफियांनी शेत जमिनी अकृषक करताना महसूल विभागाच्या नियमानुसार ले-आउट करून घेतले नाहीत. स्वत:च्या तुंबड्या भरण्याच्या उद्देशातून गुंठेवारी पद्धतीने प्लॉटची तसेच सदर जागेवर उभारलेल्या टोलेजंग सदनिका (फ्लॅट), डुप्लेक्सची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.मात्र याचा त्रास पुढे गुंठेवारी प्लॉटची खरेदी केलेल्या सर्वसामान्य मंगरुळपिर शहर व तालुक्यातील लोकांना होणार आहे. शहरात सर्वत्र गुंठेवारी पद्धतीने प्लॉटची विक्री करताना ले-आउटचे सर्व निकष नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. या ठिकाणी ओपन स्पेससाठी जमिनीच्या एकूण क्षेत्रफळानुसार दहा टक्के जागा राखीव न ठेवता त्याचीही विक्री करण्यात आली आहे. रस्ते, पथदिवे, सर्व्हिस लाइन, जलवाहिनीसाठी जागा आरक्षित न ठेवता गुंठेवारीच्या नावाखाली येथील राजकारणी व भूखंड माफियांनी सर्वसामान्य मंगरुळपिर शहरातील व तालुक्यातील लोकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे. भविष्यात नगर परिषद क्षेत्रातील अकृषक जमिनींवर नियमानुसार ले-आउटचे निर्माण केल्यास विकास कामे करताना नगर परिषदेला अडचण निर्माण होणार आहे.शहराच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४० टक्के भूभागावर राजकीय पक्षातील नेत्यांचा व भूमाफियांचा कब्जा आहे. अकृषक जमिनींचे ले-आउट केल्यास आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान होत असल्याची जाणीव भूमाफियांना असल्यामुळे संबंधितांनी गुंठेवारीला प्राधान्य दिले. आजरोजी गुंठेवारी प्लॉटधारकांना बँकेकडून कर्ज मिळत नसल्याची परिस्थिती आहे. तसेच नगर रचना विभागाकडून नकाशा मंजूर होत नाही. यामुळे प्लॉटची खरेदी करणाऱ्यांची चक्क फसवणूक होत आहे, लाखो रुपयांची संपत्ती घेऊन त्याचा उपयोग होणार नाही,दिवसांगणिक सरकारचे नियम बदलत चालले आहे,यामध्ये गुंठेवारी पध्दतीने प्लॉट घेणाऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे तर सरकारी नियमांना धाब्यावर बसवून सर्रास गुंठेवारी पध्दतीने येथील पांढरपोशे व भूमाफियांची मात्र चांगलीच चंगळ होत आहे.याबाबत वाशिम जिल्हाधिकारी यांनी गंभीरपणे घेऊन मंगरुळपिर येथील भूमाफियांच्या मुसक्या आवरून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------
                  
मंगरुळपिर शहरातील काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व स्वतःला व्यापारी म्हणून घेणाऱ्या भूमाफियांनी अर्धे शहर गुंठेवारी पध्दतीने विकले आहे,ही बाब महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही हे आश्चर्यच येथील भूमाफिया व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची मैत्री सर्वसामान्य माणसाच्या नजरेआडची आहे,मंगरुळपिर शहरातील कारंजा रोडवरचे प्लॉट ते 80 टक्के गुंठेवारी पद्धतीने विकले असून अजून एका अकृषिक शेताची अवैद्य आखणी झाल्याची चर्चा आहे,तसेच अकोला रोडवरील बालदेव भागातील एका ग्रीनझोन (शेतात)राजकीय नेत्यांच्या व भूमाफियांच्या भागीदारी मध्ये सरकारच्या महसुलाची होळी होत असून या शेतात सुद्धा प्लॉट ची अवैद्य आखणी झाली असल्याचे बोलल्या जात आहे,वाशिम रोडवर सुद्धा हीच परिस्थिती आहे, शहरातील बिरबलनाथ महाराज जुन्या यात्रा मैदानावर आज रोजी पाच हजार स्क्वेअर फूट ने प्लॉट ची विक्री झाली यामध्ये सुद्धा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली होती .
-------------------------------------
              
येथील महसूल विभाग शहरातील गौण खनिज व अवैद्य धान्य तस्करी बाबतीतही सस्पेशल फेल आहे,अवैद्य रेती तस्करी तर फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे, आणि या तस्करांचे लागे बांधे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी असल्याने त्यांची हिम्मत वाढलेली आहे तरी वाशिम जिल्हाअधिकारी यांनी तात्काळ मंगरुळपिर येथील महसूल विभागाच्या बाबतीत फेरबदल करणे गरजेचे आहे,

Post a Comment

0 Comments