मंगरुळपीर नाथ नगरीतील वंजारी समाजाचे प्रतिष्ठीत नेतृत्व श्री.माणिकरावजी गंगावणे सर यांचे निवासस्थानी माजी उपमुख्यमंत्री गृहमंत्री लोकनेते व वंजारी समाजाची शान स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांची 72 वी जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक मा.श्री. देवरावजी घुगे सर तर प्रमुख उपस्थितीमधे श्री.ग्यानुभाऊ भडागे (शिवसेना शहर उपप्रमुख)तथा श्री.माणिकरावजी गंगावणे (अध्यक्ष,प्रकल्पग्रस्त कल्याण संघर्ष समिती)यांची उपस्थिती होती.कार्यक्रमामधे वंजारी समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत भगवान बाबा व गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे फोटोस मान्यवरांचे हस्ते हार्रार्पण करण्यात आले व उपस्थितांचे हस्ते गुलाबपुष्प वाहण्यात आले. प्रास्ताविक भाषणात घुगे सर यांनी गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे आठवणींना उजाळा दिला व मुंडे साहेब असते तर समाज व ओबीसी चळवळ आणखी पुढे गेली असती असे नमूद केले त्यानंतर गंगावणे सर व भडागे यांचीही समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन राजेश भारस्कर यांनी तर आभार प्रदर्शन संजय तेलंग यांनी केले.कार्यक्रमास राजीव भेंडेकर,आनंदराव भडागे, श्रीकृष्ण ठाकरे,देवराव भेंडेकर,सहदेव हिसेकर,शंकर भेंडेकर,शाम भेंडेंकर यांचेसह समाजबांधव बहूसंख्येने उपस्थित होते.संत भगवान बाबा की जय, गोपीनाथजी मुंडे साहेब की जय नारे देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)

0 Comments