Ticker

6/recent/ticker-posts

पाणीप्रश्नावर मनसेने नगर पंचायतला दिला साडीचोळीचा आहेर



वाशिम - मालेगाव येथे वेळीअवेळी होणार्‍या पाणीपुरवठ्यामुळे एकीकडे नागरीक त्रस्त झाले असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत ३१ डिसेंबर रोजी नगर पंचायतमधील अधिकार्‍यांना साडीचोळी व बांगड्यांचा आहेर देत तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच शहरवासीयांची पाणीप्रश्नातून सुटका न झाल्यास येत्या ११ जानेवारीला नगर पंचायत कार्यालयात महिलांचा घागर मोर्चा नेण्याचा इशारा देण्यात आला.
    यावेळी निवेदन व साडीचोळीचा आहेर देतांना मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, महिला सेनेच्या पदाधिकारी सौ. संगीता चव्हाण, सिता धंदरे, सौ. बेबी धुळधुळे, बेबी कोरडे, सौ. वंदना अक्कर, वनिता पांडे विक्की वर्मा गोविंद अहिर महेश पांडे आदी उपस्थित होते.
    दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, गेल्या दोन ते अडीच वर्षाचे कालावधीपासून  महिन्यातून दोन ते तीन वेळा एका खेपेला दोन तास म्हणजेच संपूर्ण महिन्यामध्ये केवळ सहा तास व पाईपलाईन मधील शिल्लक पुरवठा एका खेपेला साधारण अर्धा तास एकूण दीडतास म्हणजेच महिन्यातून सात ते आठ तास पाणीपुरवठा करण्यात येतो. यामधुन आम जनतेची तहान भागत नाही. या तुटपुंज्या पुरवठ्यामुळे नागरकांना भटकंती करावी लागते. तसेच संपुर्ण वर्षामध्ये होणार्या ८० ते १०० तास पाणी पुरवठ्याकरीता संपूर्ण पाणीकर म्हणजेच वर्षाला रुपये १२०० भरावा लागतो. पुरवठा व वसुली याबाबत हा झिजीया कर कमी करण्यात यावा व नागरीकांना पिण्याचे पाण्याचा पुरेसा पुरवठा नियमितपणे करण्यात यावा. सदरील कारवाई तातडीने व्हावी व अपेक्षीत जनक्षोभ होण्यास आळा घालण्याचा प्रयत्न व्हावा. निवेदनावर कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतांना मथुरा बांगर, विमल गायकवाड, निर्मला जयराव, पंचफुला गुंजकर, नंदा सारसकर, बेबी गुंजकर, वैशाली गुंजकर, रशिदा नाजीमखान, रुक्साना अयुबखान, शबनम शेख नौशाद, रजीया रहीमशाह, शाहीदा रजीमशाह, साजीदा इस्माईलशाह, मणकर्णा गायकवाड, नंदा खरात, माजी शहराध्यक्ष कृष्णा इंगळे ,विनोद सावके, दीपक ताजने ,  सुलतान मिर्झा, मोहमद अजहर, गणेश दाभाडे, सुशिल दाभाडे अजय कदम, कार्तीक पांडे, संतोष शिंदे, चंद्रकांत ठाकरे, रोहीत गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments