(वाशिम/मंगरुळपीर दि.३०): मराठा सेवा संघ प्रणित वैचारिक तरुणांचे बलशाली संघटन अशी ओळख असलेल्या संभाजी ब्रिगेडची नुकतीच वाशिम येथे बैठक पार पडली. या बैठकीत संभाजी ब्रिगेड प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या हस्ते मंगरुळपीर तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे धडाकेबाज युवा कार्यकर्ता अजय गवारगुरु यांची मंगरुळपीर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. संभाजी ब्रिगेड प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांचा विदर्भ संवाद दौऱ्यानिमित्त वाशिमच्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, वाशिम (पूर्व) जिल्हाध्यक्ष डॉ.प्रशांत गावंडे, वाशिम (पश्चिम) जिल्हाध्यक्ष अर्जुन खरात, पदवीधर विभागीय अध्यक्ष प्रा.गोपाल वांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातील बहुजन समाजात काम करणारी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. संभाजी महाराज यांचे नाव या संघटनेला दिले आहे. ही संघटना समाजात परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचे काम करते. अॅड.मनोजदादा आखरे हे या पक्ष/संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रासह देशभरात मराठा सेवा संघाच्या माध्यमातून "१००% समाजकारण व १००% राजकारण" हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करणाऱ्या संभाजी ब्रिगेडने वैचारिक व आक्रमक पद्धतीने ओळख निर्माण केली आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना/पक्ष वाशिम जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असून जिल्ह्यातील हजारो युवक या संघटनेशी जुळलेले आहेत.
विदर्भ संवाद दौऱ्यावर असतांना प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांनी वाशिम येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी या बैठकीत संवाद साधला.
वाशिम येथील घे भरारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे ही बैठक पार पडली. या वेळी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments