Ticker

6/recent/ticker-posts

आठवड्याभरात पाच बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश

 वाशीम जिल्हा प्रशासनाला आठवड्याभरात पाच बालविवाह रोखण्यात यश आले आहे. वाशीम जिल्हा मधील रिसोड तालुका वगळता प्रत्येक तालुक्या मध्ये एक बाल विवाह रोखण्यात आला. बाल विवाहाबाबत लग्नापूर्वीच कल्पना मिळाल्याने योग्य दक्षता घेत चाइल्ड हेल्प लाईन १०९८ व जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा पोलीस प्रशासनाच्या मदतीने हे बालविवाह
 रोखले.दरम्यान,टाळेबंदीच्या काळात अनेक बालविवाह झाल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आल्यानंतर आता जिल्हातील सामजिक कार्यकर्ते देखील सतर्क झाले आहे  
भारतात गेल्या अनेक वर्षापासून बालविवाह प्रथा संपुष्टात यावी यासाठी बालविवाह विरोधी बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ पारीत करण्यात आला. मात्र आजही राज्यामध्ये बालविवाह होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच प्रमाणात बालविवाह थाबले आहेत. परंतु अनेक समाजात आर्थिक परिस्थिती,दारिद्र्य यामुळे आजही बालविवाह होताना दिसतात. असाच काहीशा केसेस वाशीम जिल्हातील उघडकीस आल्या. मात्र चाइल्ड हेल्प लाईन १०९८ व जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा पोलीस प्रशासनाने मालेगाव तालुक्यातील वाडीरामराव, मानोरा तालुक्यातील कोलार, मंगरुळपीर तालुक्यातील सार्शी,कारंजा तालुक्यातील पारवा व वाशीम तालुक्यातील तामसाळा येथील अल्पवयीन मुलीचे बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाने यश मिळविले. आई-वडिलांचे समुपदेशन करून हमीपत्र लेहून घेत विवाह थांबविण्यात आले. यात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, संरक्षण अधिकारी संस्था बाहय लक्ष्मी काळे, रमेश वाघ, अनंता इंगळे, रामेश्वर वाळले, एकनाथ राठोड चाइल्ड लाइनचे सदस्य अविनाश चौधरी, अविनाश सोनूने, गोपीशंकर आरु, वाशीम ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मच्छळे, समुपदेशक श्रीमती अनिता काळे,मंगरूळपीर तालुका संरक्षण अधिकारी धीरज उचित, मालेगाव संरक्षण अधिकारी एम.के.जऊळकर,जऊळका पो.स्टे.निरीक्षक आदिनाथ मोरे, आसेगाव पो.स्टे.निरीक्षक संदीप नरसाळे, ग्राम आमखेडा येथील सामजिक कार्यकर्ते नितीन जोगदंड, ग्राम बाल संरक्षण समिती यांचे सहकार्य लाभले.
   नागरिकांनी बालविवाह बाबत सतर्क राहावे जिल्ह्यात होत असलेले बालविवाह संदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णतः गुपित ठेवण्यात येते. बालविवाह संदर्भात माहिती तसेच काळजी व संरक्षणाची गरज असणारे 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना मदत करण्याकरिता चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आलोक अग्रहरी यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments