ग्राम विकास संस्था भंडारा चे संस्था पक डि.एस.बिसेन यांना समाजकार्य सन्मान गौरव पुरस्कारने उत्कृष्ट सामाजिक बांधिलकी व शाश्वत ग्राम विकास संकल्पना, महिला सक्षमीकरण चे व्यावसायिक उपक्रम, आरोग्य बाबत विविध उपक्रम, मदतीचा हात उपक्रम,आणि कोरोना काळात प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल बिधानचंद्र सिंग ,कार्यकारी संचालक, कैलास सत्याथी चिल्डेन फाउंडेशन नवी दिल्ली. हेंमती मँडम ,सुर्यकांत कांबळे कोरो इंडिया,संस्था,आदित्य धुरी सामाजिक संस्था चे सल्लागार पुणे, डॉ विनय चितळे मँडम पुणे. रमेश कुटे ,हनुमंत बारबोले,ज्ञानेश्वर हनवते यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रम दिंनाक 09/05/2022 ला भारतीय शिक्षण संस्था कोथरूड पुणे येथे हनुमंत बारबोले आशामंत फांऊडेशन सोलापूर, रमेश कुटे,सरस्वती सेवाभावी संस्था बिड ,ज्ञानेश्वर
हनवते उत्कर्ष बहु.सेवाभावी संस्था औरंगाबाद, व धनाजी धोतरकर लोकप्रबोधन विविध कलागुणदर्शन कलामंच उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था चे 90संचालक उपस्थित होते. त्याअनुषंगाने संस्थेची क्षमता बांधणी या विषयावर शिरिष कुलकर्णी ,आदित्य धुरी यांनी मार्गदर्शन केले.



0 Comments