सुधाकर चौधरी वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचा
ग्रामीण भागा असो की शहरी भाग साधारणपणे तापावरील उपचारार्थ वापरली जाणारी डोलो-६५० औषध प्रत्येक घरात आढळतं. करोना काळात अनेकांनी डोलो-६५० गोळी घेतली. त्यामुळे डोलोची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्स कंपनीचा नफा प्रचंड वाढला. त्यामुळे कंपनी आयकर विभागाच्या रडारवर आली.
: साधारणपणे तापावरील उपचारार्थ वापरली जाणारी डोलो-६५० औषध प्रत्येक घरा घरात आढळते. भीतिच्याशी निर्माण झाली होती कीकोरोना काळात अनेकांनी डोलो-६५० गोळी घेतली. त्यामुळे डोलोची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्स कंपनीचा नफा प्रचंड वाढला. त्यामुळे कंपनी आयकर विभागाच्या रडारवर आली. त्यानंतर आता डोलो-६५० बद्दल आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.डोलो-६५० चा वापर वाढावा यासाठी कंपनीनं डॉक्टरांना १००० कोटी रुपयांचे फ्री गिफ्ट दिले असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. बिझनेस टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, ६ जुलैला आयकर विभागाच्या पथकानं मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या ९ राज्यांमधील ३६ ठिकाणांवर छापे टाकले. कंपनीविरोधात झालेल्या कारवाईतून १.२९ कोटी रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम आणि १.४० कोटी रुपयांचे दागिने हाती लागल्याची माहिती सीबीडीटीनं दिली.या प्रकरणी कंपनीची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कंपनीनं ई-मेलला उत्तर दिलं नाही. सीबीडीटीनं दिलेल्या माहितीनुसार, १००० हजार कोटी रुपयांचे मोफत गिफ्ट कंपनीकडून डॉक्टरांना देण्यात आले. कागदपत्रं आणि डिजिटल डेटामधून ही माहिती उघडकीस आली आहे. ही कागदपत्रं आणि डिजिटल डेटा छाप्यांच्या दरम्यान आयकर विभागाच्या हाती लागला. आपल्या उत्पादनाचा वापर वाढावा यासाठी कंपनीनं मोफत गिफ्ट वाटल्याचं स्पष्ट झालं आहे.कोरोना काळात रेकॉर्डब्रेक विक्रीडोलो-६५० औषधाची किंमत कमी आहे. मात्र या औषधाची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्सनं विक्री करण्यासाठी वापरलेला मार्ग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. करोना संकटकाळात डोलो-६५० ची विक्री कित्येक पटींनी वाढली होती. २०२० मध्ये करोनाचं संकट जाहिरं झालं. त्या कालावधीत ३५० कोटी टॅबलेट विकल्या गेल्या होत्या. एकाच वर्षात कंपनीनं जवळपास ४०० कोटी रुपयांची कमाई केली होती. प्रशासनाने जर अशा अनेक कंपन्या आहेत आयव्ही सेट ,पीपीइकीट ज्यामुळे रुग्णांची लूट करण्यात आली त्या कंपनीचा शोध घेतला तर निश्चितच मोठे गबाळ बाहेर येऊ शकते अशी चर्चा जनसामान्यात बोलली जात आहे. कोट्यावधीची प्रॉपर्टी घेऊन गब्बर झालेले डॉक्टर आणि मेडिकल वाले प्रशासनाला दिसून येतील अशीही बोलले जात आहे.
कोरोनाच्या बहुतांश घटनांमध्ये रुग्णाला सर्दी, खोकला, ताप आणि फुफ्फुसाच्या संसर्गाच्या तक्रारी आढळून आल्या आहेत.
650 चा उत्तम वापर
डोलो-650 मध्ये पॅरासिटामॉल असते जे ताप कमी करण्यास मदत करते. कोरोनाच्या मुख्य लक्षणांपैकी एक म्हणजे ताप. यासोबत डोलो-650 डोकेदुखी, दातदुखी, पाठदुखी, मज्जातंतू दुखणे, स्नायू दुखणे यामध्येही आराम देते, म्हणूनच हे औषध कोणताही विचार न करता जोरदारपणे वापरले जात आहे. हे औषध वापरल्यानंतर, ते मेंदूला पाठवलेले पॅन सिग्नल कमी करते, ज्यामुळे रुग्णांना आराम मिळतो. या औषधाचा वापर केल्याने आपल्या शरीरात उत्सर्जित होणार्या रासायनिक प्रोस्टाग्लॅंडिनला देखील प्रतिबंध होतो, ज्यामुळे वेदना वाढते आणि शरीराचे तापमान वाढते.
0 Comments