वाशिम - राज्यातील स्पर्धा परिक्षेतील तज्ञ व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल कांगणे यांचे सलग ७ तास मार्गदर्शन शिबीर २४ जुलै रोजी स्थानिक विठ्ठलवाडी सभागृहात पार पडले. स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून आपले उज्वल भविष्य घडविणार्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी समाजसेवक राम ठाकरे, अतुल तुपसांडे व अनिल केंदळे यांनी या शिबीराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता.
संततधार पाऊस सुरु असतांनाही शेकडो विद्यार्थ्यांनी या शिबीराला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफिक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजकांच्या हस्ते प्रा. कांगणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तदनंतर राम ठाकरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना अशा प्रकारचे शिबीर घेणे ही काळाची गरज असून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी यानंतरही अशीच शिबिरे आयोजीत करण्यात येतील अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर राऊत यांनी तर आभारप्रदर्शन अतुल तुपसांडे यांनी केले.
0 Comments