मंगरूळपीर
दिवाणपुरा वॉर्ड क्रमांक 04 मध्ये पावसाच्या पाण्यामुळे नाले बंद झाल्याने रहिवाशांना त्रास होत आहे.तसे तर, शहरातील प्रत्येक रस्त्यावरील खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. तर कुठे पावसाच्या पाण्यामुळे बंद नाल्या नागरिकांनी खोदल्या आहेत. बंद नाल्यामुळे त्यातील घाण पाणी रहिवाशांच्या घरात शिरून रोगराई पसरू शकते,
यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना त्वरित बंद झालेल्या नाल्यांची स्वच्छता करून घ्यावी,अशी मागणी दिवानपुरा नागरिकांनी केली गेली होती
दिवानपुरा वार्ड क्रमांक ०४ च्या रहिवाशांचे असे म्हणणे आहे की नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनि जेसीबी मशीन द्वारा खोदला गेलेला खड्डा कित्येक दिवस झाले तरीही अजून त्याची डागडुजी केली गेलेली नाही ज्यामुळे तेथील रहिवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याच्या मधोमध पडलेला हा खड्डा अनेक अपघातांना आमंत्रण देऊ शकतो या ठिकाणी लहान बालके रस्त्यावर खेळतात तसेच या ठिकाणी काही घरेही आहेत ज्यामुळे काही बरे वाईट होण्याची शक्यता नाकारू शकत नाही त्यामुळे जबाबदार यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
परिसरातील नागरिकांचे असे म्हणणे आहे की या खड्ड्यामुळे काही अपघात, दुर्घटना जर झाली तर त्याला जबाबदार कोण ?
0 Comments