याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी तेजस ठाकरे राजकारणात येणार नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्याला यायचे असेल तर तो सांगेन. कोणीतरी अफवा पसरवतं तीच पुढे नेली जाते. हे चुकीचं आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या उत्तरामुळे तूर्तास तरी तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदार केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबायला तयार नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठींबा वाढत आहे. अशातच मुंबई महापालिकेची निवडणूक आणि राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाचविण्याचा मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.
तसेच तेजसचा स्वभाव हा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांसारखा असल्याचे स्वतः बाळासाहेबांनी एका भाषणात म्हटले होते. शिवसेनेच्या बंडखोरांचे आव्हान थोपविण्यासाठी व सेनेला नवी उभारी देण्यासाठी तेजस ठाकरेंचे सक्रिय होणे महत्वाचे मानले जात आहे. एकीकडे आदित्य ठाकरे राज्याच्या विविध भागांचे दौरे करत आहेत.
यापूर्वी अनेकदा तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र, तसे घडले नाही, काही मोजक्या राजकिय घटना वगळता तेजस ठाकरे हे राजकारणापासून दूरच असल्यचे दिसून आले होते. मात्र, आता शिवसेनेची मातब्बर नेते मंडळी सोडून गेल्यामुळे तेजस ठाकरे मैदानात उतरून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करून शकतात, अशीही चर्चा सुरू आहे.
0 Comments