Ticker

6/recent/ticker-posts

अवैधरित्या गोवंश मांसची विक्री करणारे मानोरा पोलिसांच्या ताब्यात


पोलीस स्टेशन मानोरा येथील अधिकारी व कर्मच्यारी यांनी गोमांश भरलेले बोलेरो पिक अप पकडुन धडक कार्यवाही करुन 9,66,500/- चा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस स्टेशन मानोरा येथील मयुरेश तिवारी ब.नं. 1108 सोबत बालाजी महाले ब. नं. 1177 सुरज खाडे ब.नं.76 असे सरकारी जिप क्र. एम. एच. 12 टिडी 8496 सह दिनांक 02/08/2022 रोजी 20.00 सुमारास मानोरा शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक पांढऱ्या रंगाचा बोलेरो पिक अप वाहन क्रमांक एम एस 37 टी 1989 मध्ये गोवंशाचा मास घेऊन अमरावती येथून निघून काही वेळातच मानोरा मार्गे हैदराबाद येथे जाणार आहे. अशा गुप्त माहितीवरून अश्या गुप्त मीहितीवरुन पो. नि. शेळके यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही व सोबतचे पो. स्टाफ मानोरा येथे शिवाजी चौकात पाळत ठेवून थांबलो असता अंदाजे 22.10 वा. चे सुमारास कारंजा वरून वरील क्रमांकाचा वाहन येताना दिसला त्याचे चालकाला थांबण्याचा हात इशारा केला असता त्याने त्याचे वाहन न थांबविता त्याने त्याचे ताव्यातील वरील क्रमांकचे वाहन शिवाजी चौकातून गव्हा गावाकडे जाणान्या रोडने पळविले त्याचा आम्ही पाठलाग करत गेलो असता. तो त्याचे वाहन गव्हा, रतनवाडी, फुलंब्री, उमरी खुर्द, कडे जाताना वसनगर ते आम किन्ही गावाच्या मध्ये आम्ही रोडवर थांबून चालक व त्याचे साथीदार त्यांचे नाव गाव विचारले असतात त्यांनी त्यांचे नाव चालक क्र. 1 अशपाकउद्दीन ईलमुद्दीन वय 25 वर्ष रा. दिवानपुरा मंगरूळपीर व त्याचा साथीदार वाहनाचा मालक क्र. 2 मोहम्मद साहेब अब्दुल सईद वय 22 वर्ष रा. चेहेलपुरा वार्ड नंबर 5 मंगरूळपौर असे सांगितले त्यांना त्यांच्या वाहनात काय आहे, असे विचारणा केली असता प्रथम त्यांनी उडवा उडीचे उत्तरे देऊन जनावरांचे मास असल्याचे व ते मास अमरावती येथून आणले असून हैदराबाद येथे घेऊन जात आहोत असे सांगितले. वरून वाहनातील मालाची पाहणी केली असता सदर वाहनात लसनाच्या कट्ट्याच्या खाली जनावराचे मास आढळले. ते मास गोवंशाचे असावे असा दाट संशय आल्याने नमूद आरोपी हे जनावरांचे मासाची चोरटी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर वाहन पो.स्टे. आणून वाहनातील मासांची दोन पंचायत समक्ष पाहणी केली असता, सदर वाहनात अंदाजे 10 क्विंटल जनावराची मास किंमत अंदाजे 2,00,000/- रुपयाचा मिळून आला. तसेच नमूद जुने वापरते वाहनाची किंमत अंदाजे 7,50,000/- रुपये लसन असेले कट्टे एकुण 22 कट्टे प्रत्येक कट्याचे वजन 15 असा किमत 16500/- रु असा एकूण 9.66.500/- चा माल मिळुन आल्याने नमूद वाहनातील मासांपैकी काही मास सी.ए. संपले करिता एका प्लास्टिकच्या चरणीत वेगळी काढून पशुवैद्यकीय अधिकारी मानोरा यांचे मार्फत सी. ए. तपासणी करिता राखून ठेवले आहे. नमूद पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सदरचे मासे जनावराचे असल्याचे प्राथमिक अहवालात नमूद केले आहे. सदरची कार्यवाही दिनांक 03/08/2022 चे 09 वा.10.00 वा. दरम्यान करण्यात आली. तरी नमूद आरोपितांविरुध्द कलम 379, 34 भादवी सहकलम 5.5 (क.9 (अ)) प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक साहेब श्री. बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक श्री गोरख भांगरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक मानीरा यांचे मार्गदर्शनाखाली केली नापोको मयुरेश तिवारी ब.नं. 1108 नापीको बालाजी महाले बनं 1177 डिपीसी, सुरज खाडे बने 76 यांनी केली असुन पुढील तपास पोको 915 शरद राठोड पोको/ 424 चेतन भोयर हे करत आहे.

Post a Comment

0 Comments