Ticker

6/recent/ticker-posts

अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यावर कारंजा शहर पोलिसांची कार्यवाही



अवैधरित्या शस्त्र बाळगून काही इसम समजात धहशत पसरवत असतात व त्यांचे कडून गंभीर स्वरूपाचा गुन्हा होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांना आवार घालून कायद्याचा धाक त्यांचे मनात निर्माण व्हावा याकरिता. त्यांच्यावर मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली कायद्याचा बडगा उगारत कारवाईचा सपाटा सुरु आहे.

दिनांक 01/08/2022 रोजी चे रात्री 23/00 वा दरम्यान पोका रोहन ब.न. 906 सोबत पोकों फिरोज़ व नं 1345 झाशीराणी चौक कारंजा येथे उभे असातांना माहीती मिळाली की अप क्र 889/22 क 65 ई मधील पळालेला आरोपी भारत येवतकर हा रिलायन्स चौक येथे भारत हॉटेल वर हा आला आहे. अश्या प्राप्त माहिती वरून पोकाँ फिरोज सह खाजगी मोसा ने नमूद ठिकाणी गेलो असता नमूद आरोपी हा आम्हाला पाहून पळून जावू लागला. आम्ही दुचाकी उभी करून त्याचा पाठलाग केला. आरोपी पिंजर पोहा रोडने पळत सुटला त्याला कसेबसे पकड़न्यचा प्रयत्न केला असता आरोपी रोडवर पडला. त्याला जावून पकडले असता त्याने आमच्याशी झटापटी केली. त्याचेवर सौम्य बळाचा वापर केला त्यास भारत हॉटेल जवळ आणले असता आरोपी पून्हा झटका देवून जवळच उभे असलेल्या पांढ-या रंगाच्या मारोती स्विफ्ट डिझायर मध्ये जावून बसला त्याचे मागेच आम्ही पळून त्यास पून्हा गाडीत पकडले आणि गाडीचे दार उघडून त्यास बाहेर काढले असता त्याचे पायाला फाटक लागले त्याच वेळी खाली नजर गेली असता ड्रायव्हर सीट जवळ एक लोखंडाचा कोयता दिसून आला तो ताब्यात घेवून सपोनि जाधव सा. पोहेकाँ 04, नापोकाँ 182, पोकों 1453 यांना माहिती देवून नमूद ठिकाणी बोलावले त्यांचे समक्ष आरोपी बाबत माहिती देवून आरोपीस हत्यार व वाहन क्र एम एच 15. सीटी 1505 अं कि जूनी वापरती 1,00,000 रू. सह पो.स्टे. आणले व नमूद हत्यार वेगळ्या जप्ती पंचनाम्या प्रमाणे पंचासमक्ष जप्त केला. सदरचा इसम हा अवैध्यरित्या लोखंडाचा कोयता बाळगत असतांना मिळून आल्याने त्याचे विरुद्ध भा.ह. का. क. 4,25 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस उपविभागीय अधिकारी कारंजा श्री. जगदीश पांडे, ठाणेदार श्री. अधारसिंग सोनोने यांचे नेतृत्वाखाली सपोनि प्रशांत जाधव, पोहेकॉ चरण चव्हाण, नापोकॉ. अनिल राठोड, पोकों, फिरोज खान, पोकों, पवन जाधव, पोकों, रोहन तायडे यांनी सदरची कामगिरी पार पाडली.

Post a Comment

0 Comments