वाशिम, दि. 16
: भारत निवडणूक आयोगाने मतदार यादयांच्या प्रमाणिकरणासाठी आणि मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्याचा कार्यक्रम 1 ऑगस्टपासून सुरु केला आहे. 16 सप्टेंबरपर्यंत जिल्हयातील 9 लक्ष 52 हजार 545 मतदारांपैकी 4 लक्ष 65 हजार 781 मतदारांच्या मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्यात आले आहे. या कार्यक्रमाविषयी मतदारांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. 11 सप्टेंबर रोजी जिल्हयातील 1 हजार 51 मतदान केंद्र व मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय येथे मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन देखील करण्यात आले होते.
0 Comments