Ticker

6/recent/ticker-posts

मास्कोतील पुतळा अनावरण निमित्त अनुलोम संस्थेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम


वाशिम - राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १४ सप्टेंबर रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण रशियाची राजधानी मास्को येेथे करण्यात आले. याचे औचित्य साधून अनुलोम संस्थेच्या वतीने १४ ते १८ सप्टेंबर या पाच दिवसात संपुर्ण महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठेंना अभिवादन अभियान राबवून त्यांचे विचार जनतेपर्यत पोहचविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने १५ सप्टेंबर रोजी शहरातील काळे फाईल भागातील मातंग वस्तीमध्ये अभिवादन कार्यक्रम राबविण्यात आला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. मातंग संघाचे विदर्भ अध्यक्ष संजय वैरागडे, प्रमुख वक्ते म्हणून आशिष देशमुख, अनुलोमचे वस्तीमित्र निखिल थोरात, स्थानमित्र नितीन पिंजरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय अनुलोम भाग जनसेवक विजय धोंगडे यांनी केले. अध्यक्ष व प्रमुख वक्त्यांनी आपल्या मनोगतातून अण्णाभाऊ साठे यांचे सामाजीक कार्य व त्यांच्या विचाराविषयी उपस्थितांना माहिती दिली. आजच्या युवा पिढीने त्यांचा आदर्श घेवून आपले जीवन घडवावे असे आवाहन केले. कार्यक्रमाला वस्तीमधील मातंग समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभारप्रदर्शन केदारनाथ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल आवारे, अजय रणखांब, राजु गायकवाड, आशिष महाजन, 
दिपक महाजन, अक्षय व्यवहारे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments