मुर्तिजापुर : ०७ , श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार , वंचित बहुजन आघाडी प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्तिजापुर तालुका वचित बहुजन आघाडी च्या कार्यकारणी मध्ये निवड झाल्या बद्दल पक्षाची आढावा बैठक कृपा मंगल मुर्तिजापुर येथे पार पडली . सदर बैठकी करिता वचित चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे व जिल्हाच्या नेत्या प्रतिभाताई अवचार यांची प्रामुख्याने उपस्थीती होती. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या फोटोला हारअर्पण करून बैठकीला सुरुवात झाली. उपस्थितांमधून आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले . जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी अध्यक्ष भाषणातून उपस्थित आमचे मन जिंकून घेतले . पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा व पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान करा . पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा व जिल्ह्यात आपली सत्ता कशी येईल असे आव्हान कार्यकर्ता समोर केले.ई. महत्वपूर्ण भाषण केले. महासचिव मिलींद इंगळे यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनतर तालुका कार्यकारणी मध्ये नवनियुक्त तालुका अध्यक्ष अध्यक्ष पदी सुनीलभाऊ सरदार तर तालुका महासचिव पदी अक्षय जोगळे ,संघटक पदी संजय रौंदळे , कोषाध्यक्षपदी गौरव मेसरे , प्रसिध्दी प्रमुख पदी अतुल नवघरे व महीला आघाडी तालुका अध्यक्ष वानखडे ताई यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या वतीने व विविध संघटनेच्या वतीने , कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे व महासचिव मिलींद इंगळे यांचे पुढच्या तालुक्याच्या वतीने शाल श्रीफळ देवुन स्वागत करण्यात आले. यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदर बैठक पार पडली व आढावा बैठक मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे व अतिथी म्हणुन प्रतिभा अवचार हे होते. सदर बैठकीदरम्यान विविध पक्षांच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश घेतला . सदर बैठकीच्या कार्यक्रमाचे संचालन देवानंद जामनिक यांनी केले तर स्वरानंद सरदार यांनी आलेल्या पाहुण्याचे गितसुमनातुन गायन करुण स्वागत केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील सरदार यांनी केले. आभार प्रदर्शन प्रधान गुरुजी यांनी केले. सदर बैठकी मध्ये संदीपभाऊ सरनाईक , पंडितराव वाघमारे , मोहन रोकडे , मुक्तारभाई , वैभव यादव ,इम्रान भाई तस्वर खान , प्रधान गुरुजी ,प्रतिभा अवचार , महिला आघाडी तालुका अध्यक्ष लक्ष्मीबाई वानखडे ,स्वरानंद सरदार , शुभम कोगदे , संजय वानखडे ,संजय झारोडिया , श्रीकांत मेश्राम ,निखिल गावंडे, महादेवराव खांडेकर, किशोर राऊत, सरपंच राजू मोहोड , किशोर शिरसाट ,मयूर पवार, नितीन जाधव ,सुनील तमखाने ,नकुल काटे , बाबाराव घुरडे , शशिकांत सरोदे , मुर्तिजापूर तालुक्याचे बौध्द महासभेचे अध्यक्ष बोरखडे सर , अंतगत बोरकर ,करण वानखडे ,अमर कांबळे , टाले भाऊ ,अरुण वानखडे ,अमोल थोरात ,सौरभ सरदार ,सतीश खंडारे , स्वप्निल श्रीकृष्णा सरदार , राहुल वाकोडे , संकेत कोल्हे , बंडु वानखडे , सुनिल सरोदे, रवि वानखडे , सह बहुसंख्य तालुक्यातुन आजी माजी पदाधिकारी , संचालक , नगरसेवक , आजी माजी जि.प सदस्य , आजी माजी पं.स. सदस्य , तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे युवक व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments