आजचा आपला भारतीय समाज ब्रेक तुटलेल्या मोटारीसारखा विनाशाच्या मार्गाने भन्नाट वेगाने धावत आहे. पण याची जाण त्याला नाही आहे. जो तो पैशाच्या मागे धावत आहे. सकाळी उठल्यापासून हे माझं ते माझं ते माझं, पण ते सहजासहजी त्याच्या हाती लागत नाही, तो पुढेपुढे पळतो माणूस त्याच्या मागे धावतो आहे. त्याला हस्तगत करण्यासाठी तो अवमार्गाचा अवलंब करतो व यातूनच गुन्हेगारीचा जन्म होतो व भ्रष्टाचार फोफावत जात आहे.
आज जगात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पैशासाठी काहीही करायला मागेपुढे पाहात नाहीत. चोऱ्या होतात, बँकावर दरोडे पडतात, कुणाचे खून पाडले जातात आणि या प्रकारे मिळविलेल्या पैशाने देखील काहीही होत आहे. काही गुन्हेगारी प्रकरणं पैशाने दाबल्या जातात, पैशामुळे आज न्यायसुद्धा विकत घेता येतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ही सर्व गुन्हेगारी प्रवृत्तींचीच उदाहरणे होत. गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी कायदा अंमलात आहे .पण गुन्हेगार कायद्याची भिंत पार करून भर रस्त्यावर गुन्हे करतात. पोलीस कस्टडीमध्ये घुसून खून केले जातात. आज जो कायदा हातात असणारे आंधळ्या डोळ्यांनी पाहतात .पण ते सुद्धा काही करू शकत नाहीत. कारण त्यांना सुद्धा हाव आहे पैशाची. पैशाने मोठमोठ्या अधिकाऱ्यांना, गुन्हेगाराणा विकत घेतात व बिनधास्तपणे गुन्हे करण्यास धजावतात. "आज कोई नारा न होगा, सिर्फ देश बचाना होगा"
आज जिकडे पाहावे तिकडे गुंडाराज दिसतो व त्याला सर्वसामान्य जनता बळी पडत आहे. आता कुठेच गुन्हेगारी, भ्रष्टाचार नको, फक्त देश वाचवावा लागेल. कारण आज. सामाजिक, आर्थिक व राजकीय या सर्व क्षेत्रात गुन्हेगारी, भ्रष्ट्राचाराचे प्रमाण इतके वाढले आहे की या गुन्हेगारी मुळे भारतीय लोकशाहीच धोक्यात आलेली दिसते. सध्या आलेले शिंदे सरकार त्याचे जिवंत उदाहरण आहे.याचे मूळ कारण जर शोधण्याच्या प्रयत्न केला तर वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, भ्रष्टाचार इत्यादी होय या कारणांनी आज देशाची स्थिती खालावलेली होत आहे. प्रत्येक राजकारणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंडागिरी करतो किंवा गुडांना पाळतो. म्हणजेच गुंडगिरी शिवाय राजकारण नाही. राजकारणाचे गुंडागर्दीत रूपांतर झाले. त्यामुळे गोरगरीब लोकांचा, युवकांचा लोकशाही वरील विश्वास कमी होतांना दिसतो आहे. सर्वसामान्य माणसाचा या देशात पैसा दिल्या शिवाय न्याय, नोकरी, शिक्षण इतकेच नाही तर अन्न, वस्त्र, निवारा मिळणे अशक्य झाले आहे. प्रत्येक लिडर (नेता) उठल्यासुटल्या नारे, आश्वासन देतांना दिसतात परंतु त्याची कृती मात्र शून्य असते. या सर्वांना माझी एक आग्रहाची विनंती आहे की "आज कोई नारा न होगा सिर्फ देश बचाना होगा l राजकारणच गुंडांचं आहे गुन्हेगारीचं प्रमाण रोज वाढतं आहे .यात तिळमात्र शंका नाही.
भ्रष्टाचार चांगल्या प्रतिष्ठेनं नांदतोय, आपण तो मनसोक्त खपवून घेतोय ! कुणालाच त्याच्या विरोधात पाऊल उचलायची हिमत होत नाही.
हे जरी सत्य असलं तरी राजकारणांच्या विरोधात कुणी तरी पाऊल उचलायालाच पाहिजे होतं. आजचं राजकारण मुळात गुंडागिरीवर अवलंबून आहे.
भ्रष्टाचार विरोधी मोहिम नुसत्या खैरनार, अण्णा हजारे यांनी मिळून चालवायची नाही तर त्यांला जनतेने जन आंदोलनात रूपांतर करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. प्रत्येक युवकाने या कार्यात सहभागी व्हायलाच पाहिजे.गावोगावी, शहरा शहरात खैरनार - शेषन, अण्णा हजारे निर्माण व्हायला पाहिजे. त्याशिवाय भ्रष्टाचार निमूर्लन शक्य नाही.जर आपण आपल्या जीवाच्या काळजीतन भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात पाऊल उचलली नाहीत तर त्यांच्या दहशतीखाली किती गुदमरायचं ! त्यापेक्षा एकदाच खैरनार होऊन जगलेलं बरं, मग त्यात मृत्यु असो की जीवन, नाही तर एक दिवस हा देश वाढत्या गुन्हेगारी व भ्रष्ट राजकारणामुळे पुन्हा गुलाम व्हायला वेळ लागणार नाही . देश आज थोड्या प्रमाणात का होईना पण प्रगतीपथावर असलेल्या या माझ्या (आपल्या सर्वांच्या) हिंदुस्थानात 'गुन्हेगारी' नाही. असे म्हणून चालणार नाही. कारण आपण वर्तमानपत्र वाचतो, रेडिओ ऐकतो, टी. व्ही. बघतो या सर्व प्रसारमाध्यमांद्वारे सामान्य माणसालाही समजते की, माझ्या ह्या 'महान' देशात 'गुन्हेगारी' नावाच्या रोपट्याच्या बिया रुजून त्यांची वाढ जलद गतीने होत आहे. आणि है एक विषारी रोपटं आहे. मग ह्या (विषारी) रोपट्याची वाढ कोणीच कशी थांबवीत नाही ? हा प्रश्न पडतो.परंतु ह्या रोपट्याला अगोदरच लागलेल्या फळांमधील बियांची (गुन्हेगारांची) संख्या या देशात बरीच वाढलेली असल्याने जो कोणी ह्या गुन्हेगारीविरूद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न करतो, त्या आवाज उठविणाऱ्यालाच गुन्हेगार बनविण्यात येते जबरदस्तीने जेलमध्ये टाकने सुरू आहे.
कारण या आवाज उठविणाऱ्यावर खोटा आरोप (इल्जाम ) ठेवला जातो. पर्यायाने हा आवाज उठविणारा 'आरोपी' अर्थातच गुन्हेगार बनतो. परंतु तो खरोखरचा गुन्हेगार नसतो. त्याला गुन्हेगार बनविलेलं असतं ते 'काही' लोकांनी. हे लोक विशिष्ट असतात. ह्या ‘विशिष्ट' लोकांपुढे 'सामान्य' माणसाचं काय चालणार ? कारण हे लोक आवाज उठविणाऱ्याचा आवाजच बंद करून टाकतात आणि तोही कायमचा. ही गोष्ट इतरांना कळते त्यामुळे पुन्हा कोणीही ही गुन्हेगारी बंद करण्याविषयी आवाज उठवीत नाही.म्हणूनच ही गुन्हेगारी वाढीत आहे.
ज्याप्रमाणे एक चोरी केली आणि ती पचली म्हणजे माणूस दुसरीही चोरी करतो. त्याचप्रमाणे एखाद्या माणसाने एखादा गुन्हा केला आणि तो पचला म्हणजे त्या गुन्हयाची कोणीही दखल घेतली नाही किंवा गुन्हा करणाऱ्याला कोणतीही शिक्षा केली नाही तर पुन्हा दुसरा गुन्हा करण्यास गुन्हेगार उद्युक्त होतो. जणू त्याला गुन्हा करण्यास उत्तेजनच मिळते.
पर्यायाने गुन्हेगारी प्रवृत्तीला एकप्रकारे खतपाणीच मिळत आहे. हे खत व पाणी मिळाल्याने 'गुन्हेगारी' नावाचे रोपटे जोमाने वाढत आहे. या रोपट्याचे रूपांतर विशाल वृक्षात होत आहे आणि आज परिणाम असा होत आहे की, हिंदुस्थानचे भावी आधारस्तंभ म्हणजे आजची कोवळी बालके गुन्हेगारी प्रवृत्तीकडे झुकलेली दिसतात 'बालगुन्हेगारी' हे याचेच एक उदाहरण आहे.यामुळे गुन्हेगारांचा समूळ नाश व्हायला हवा. तसेच शिक्षकांनी गुन्हा करण्यापासून विद्यार्थ्यांना दूर करावे. गुन्हेगारी ही वाईट प्रवृत्ती आहे. हे त्यांच्या मनावर ठसवावे. गुन्हा केल्याने होणाऱ्या दुष्परिणामांची त्यांना जाण द्यावी. एवढे करूनही एखाद्या मुलाने गुन्हा केलाच तर त्या मुलाला त्याच्या वयानुसार योग्य ती शिक्षा करावी की त्याची गुन्हा करण्यास इच्छाच होणार नाही.या सर्व प्रयत्नातून गुन्हेगारीहीन शाळा, समाज, राज्य आणि एक दिवस गुन्हेगारीविहीन देश बनेल यात शंका नाही. यासाठी गुन्हेगारी विरूद्ध आवाज उठविणारी एक संघटना व देशाची पॉलिसी सुद्धा असायला हवी. कारण एकट्याने काही काही प्रश्न सुटत नाहीत. परंतु अनेकांच्या सहकार्याने ते प्रश्न एकत्रित आल्याने जरूर सुटतात. म्हणूनच म्हटले आहे. "एकीचे बळ मिळते फळ" असे एका गुन्हेगारी प्रवृत्ती नकोसी वाटणाऱ्या समाजसेवकाचे अंतरमन सांगते आहे. यासाठी तुम्ही आम्ही शासन यांनी एकत्र येऊन काम करण्याची आज मोठ्या प्रमाणात आहे .नाहीतर हा भारत देश पुन्हा दुसरा गुलामगिरीकडे मार्गक्रम करीत आहे. याला विरोध करण्यासाठी देशातील सज्जन शक्तीने संघटित होऊन लढा देण्याची तीव्र गरज आहे. लेखक गजानन ओंकार हरणे. खडकी ,अकोला..........
संवाद...९८२२९४२६२३. . लेखक समाजसेवक, वक्ता, कवी, साहित्यिक, नाट्यकर्मी, तज्ञ मार्गदर्शक, शंभरच्या वर पुरस्कार प्राप्त आहे.
0 Comments