मंगरूळपीर शहरातील दिवानपुरा वार्ड क्रमांक 3 मधील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी संजू आधार वाडे विचारमंचचे उपाध्यक्ष शेख नवेद यांनी दि 14 रोजी मुख्याधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती या निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकारी यांनी रस्त्याची दखल तात्काळ वर्क ऑर्डर काढली मात्र संबंधित कंत्राटदार विलंब करीत आहे परिणामी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे झाल्यास संबंधित कंत्राटदाराला जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा दाखल करण्यात येईल असा इशारा शेख नवेद यांनी दि 27 रोजी निवेदनाद्वारे दिला आहे
सदर निवेदनाचा आशय असा की मंगरूळपीर शहरातील काही रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर चालणे, वा वाहतूक करणे हे मोठे जिकरीचे काम झाले आहे धोकादायक रस्त्यामुळे मोठा अपघात होऊन या अपघातात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे यातून विपरीत घटना त्यामुळे या रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी शहरातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, याकरिता निवेदन देण्यात आले याची दखल घेऊन
मंगरूळपीर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधिल दिवाणपुरा भागातील मुख्य रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडलेला आहे. सदरहू खड्डा रस्त्याच्या मधोमध असल्याने व वर्दळीच्या रस्त्यातील हा खड्डा धोकादायक ठरू शकतो. या खड्ड्यामुळे अपघात वा अनूचित घटना घडू शकतात. दिवाणपुरा भागातील रस्त्यांवर अपघात वा अनूचित घटना घडण्यापूर्वी त्वरीत सदर रस्त्यावरील खड्डा बुजविण्यात येवून रस्ता दुरुस्ती करावी. तसेच शहरातील इतर भागांतील रस्त्यांना पडलेले खड्डेही बुजवून रस्ते दुरूस्ती करावी,
तसेच शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करून द्याल व शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावे अशी मागणी करण्यात आली ही बाब लक्षात घेऊन वर्क ऑर्डर काढण्यात आली परंतु अदयापही रस्त्याचे काम सुरु केले नाही या रस्त्यावर अपघात घडून जीवित हानी झाल्यास कंत्राटदाराला जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल
या निवेदनावर .नाना देवळे,सागर उखाड़कर, मो, जाबीर, मो, नजीर,मो, नावेद, मुकुंदसिंग ठाकूर, मुदसिर, वसीम, सऊद अहमद, आफताब, तोसिफ शेख, नदीम अहमद, फरास , दीपक सोळंके, इत्यादी स्वाक्षरी आहे,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
0 Comments