मंगरूळपीर येथे नवनियुक्त बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख, महादेवराव ठाकरे आणि नवनियुक्त युवासेना जिल्हा प्रमूख रवी भांदुर्गे यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना नेत्या खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हि संकलापना राबविण्याबाबत सर्व सामान्य जनतेच्या विविध समस्यांवर भर देण्यात येईल अशा अनेक विषयावर दि 29 रोजी चर्चा करण्यात आली,
तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा नियुक्त्या लवकरच करण्यात येतील असे जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे यांनी सांगितले व युवासेना जिल्हा प्रमुख रवि भांदूर्गे यांनी युवासेना बळकट करन्यास सांगितले,यावेळी तालुका प्रमुख मनीष गहूले, शहरप्रमूख शंकरसिंह ठाकूर, उपतालुका प्रमुख ठेर उपतालु
का प्रमुख रवी लांभाढे, शहर प्रमूख संतोष बळी,उपशहरप्रमुख पवण इरतकर शेख नवेद यांच्यासह मंग्रुळपीर तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येनं उपस्थित होते




0 Comments