वाशिम, दि.१९ पहिल्या महिला प्रधानमंत्री भारतरत्न स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.
सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे यांनी स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी नाझर आनंद आरू,महसूल सहाय्यक सुवर्णा सुर्वे, शीतल पावडे, गजानन बोंबले, सुधाकर दूबे,संजय गोगरकर यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिज्ञा उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली.
****
0 Comments