वाशीम, १७ डिसेंबर
तालुयातील उकळीपेन येथील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्र रुग्णांसाठी वरदान ठरत असून, अवघ्या दीड महिन्यात याठिकाणी तब्बल १५ हजार रुग्णावर उपचार करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी मनीषा चव्हाण, औषधी विभागाचे संजय दामोदर काळे, डॉ. थोरात, डॉ. जाधव, आरोग्य सेवक संजय टाले, सिस्टर प्रधान मॅडम, पैठणे मॅडम, प्रेमानंद नप्ते, विजय गोटे, सपना आढाव, परिचर राजू गोटे, शुभम सुरदूसे, महादेव सुरूशे, करीम हुसेन, ज्योती भगत, रेणुका कालवे आदी कर्मचारी याठिकाणी आपली सेवा देत असून,कर्मचार्याकडून मिळत असलेल्या उत्कृष्ट सेवेबाबत रुग्णांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.
तत्कालीन मुख्यमंत्र तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून उकळीपेन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करुन त्यासाठी तब्बल १२ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला. अवघ्या दोन वर्षातच आरोग्य केंद्राची सुसज्ज भव्यदिव्य इमारत उभी राहीली. याठिकाणी अधिकारी, कर्मचारी नियुक्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ता सुरदूसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अधिकारी, कर्मचार्यांच्या नियुक्ती झाली आणि आरोग्य केंद्र ७ नोव्हेंबर २०२३ रोजी रुग्णसेवेत रुजू झाले.
उकळीपेन हे गाव ८ ते १० हजार लोकवस्तीचेे गाव आहे. तसेच उकळीपेन गाव परिसरातील ८ ते १० गावातील रुग्णांसाठी जवळ आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. नसीर शेख यांच्याकडे जबाबदारी आहे. तसेच डॉ. कोरे हे देखील या आरोग्य केंद्राकडे जातीने लक्ष देवून आहेत. डॉ. बेलखेडे यांनी याठिकाणी वेळोवेळी आरोग्य शिबिर घेवून त्याचा लाभ रुग्णांना मिळवून दिला. याठिकाणी अवघ्या दीड महिन्यात तब्बल ६० महिलांवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. याठिकाणचा परिसर स्वच्छ असून, रुग्णांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. आतापर्यंत दोन महिलांचे बाळंतपण (प्रसुती) याठिकाणी झाल्या आहेत. याठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना आरोग्य केंद्र अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने साडीचोळी देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
रात्री, अपरात्री आलेल्या रुग्णांना याठिकाणी उपचार मिळत असून, याठिकाणचे अधिकारी, कर्मचारी हे रुग्णांना उपचार देण्यासाठी तत्पर हजर राहून आपली सेवा देत आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील रुग्ण याठिकाणी येवून रुग्णसेवेचा लाभ घेत आहेत. चौकट...
विविध मान्यवरांच्या भेटी
उकळीपेन आरोग्य वर्धिनी केंद्राला विविध मान्यवरांनी भेट देवून येथील कामकाजाची पाहणी केली तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले. भाजपा नेते राजू पाटील राजे यांनी देखील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन पाहणी केली व कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
चौकट...
प्रा. आ. केंद्र निर्मितीसाठी दत्ता सुरदूसे यांचा पाठपुरावा
उकळीपेन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, यासाठी भाजपा कार्यकर्ते दत्ता सुरदूसे यांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. एवढेच नाहीतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ना. देवेंद्र फडणवीस, आ. लखन मलिक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदने देवून मागणी केली. सुरदूसे यांच्या परिश्रमाचे फळ म्हणून आज उकळीपेन येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्यदिव्य सुसज्ज इमारत उभी आहे.
छायाचित्र - महिला रुग्णांचा साडीचोळी देऊन सत्कार करतांना
छाया - डब्ल्यूएम पीडिएफ १७ डिईसी ०१ जेपीजी.
..............
0 Comments