Ticker

6/recent/ticker-posts

श्री धानोरकर आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात "कायदे विषयक सुरक्षा संवाद" मार्गदर्शन

          
श्री धानोरकर आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा खुर्द येथे दिनांक 14 डिसेंबर रोजी मुलींना "कायदे विषयक सुरक्षा संवाद" या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेशभाऊ धानोरकर सर ,तसेच प्रमुख पाहून्या उपविभागीय पोलीस अधीक्षक मा.निलिमा अरज मॕडम, व आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार उपस्थित होते. उपविभागीय अधीक्षक यांनी मुलींची सुरक्षा या विषयावर संवाद साधून मुलींसाठी असलेले विविध कायदे समजावून सांगितले, यावेळी स्वतःचे रक्षण कसे करावे व आपल्या मनातील समाज कंटकाबद्दल असलेली भीती कशी दुर करावी याबद्दल मुलींना मार्गदर्शन केले.यावेळी विद्यालयातील सौ.ए. एम.धानोरकर मॕडम , वाय.ए.होले मॕडम,व आर.व्ही.चौधरी मॕडम आणि मोठया संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments