समाजसेवक जगदीश जी काबरा यांना वाढदिवस अभिष्टचिंतन हार्दिक शुभेच्छा !!तुम जियो हजारो साल साल के दिन हो लाखो हजार!!!
सामाजिक कार्यकर्ते,
विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले जगदीश जी मोतीलालजी काबर यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन ! मंगरूळनाथ तालुक्यात नव्हे तर वाशिम जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात गेल्या तीस वर्षापासून कार्यरत असलेले अनेक संघटनेसोबत जुळून समाजसेवा करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते हसतमुख व्यक्तिमत्व नेहमी अडला-नडल्यांच्या मदतीला धाऊन जाणारे व समाजकार्यात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व म्हणजे जगदीश जी काबरा . मंगरूळपीर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या बांधणीसाठी संघटन करण्यासाठी डॉक्टर कडूकार यांना सोबत घेऊन व संघासोबत राहून समाज उपयोगी कार्यात हातभार लावला कोणत्याही प्रकारचं प्रसिद्धीचे माप आपल्या पदरात न घेता इतरांना मोठं करण्याचे कार्य या अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या जगदीश भाऊ ने केले असल्याच्या पावत्या देता येईल
अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. अनेक कार्यक्रम राबवून त्यांनी समाजाची सेवा केली आहे अजूनही त्यांचे हे कार्य राबवून त्यांनी अनेक लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदत केली आहे.
समाजकारणासोबतच राजकारणातील मास्टरमाईंड म्हणूनही त्यांना अनेक लोक ओळखतात नगरपरिषद राजकारणापासून तर जिल्ह्यातील विधानसभा लोकसभा या राजकारणामध्ये ते नेहमी कार्यरत असतात.
अशा या ध्येयवादी समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा!!!
वाशिम खबर आज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी व चौधरी परिवाराच्या वतीने
0 Comments